मुंबई : दिवाळीच्या पहिल्या दिवशी विविध ठिकाणी मोठ्या प्रामाणावर फटाक्यांचा वापर केल्यामुळे केल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी हवेतील प्रदूषणाचा स्तर वाढल्याचं लक्षात आलं. एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) मध्ये हवेतीस प्रदूषणाचा स्तर पाहिला असता दुपारनंतर हे प्रमाण वाढल्याचं लक्षात आलं. एकट्या दिल्लीमध्ये AQI 341 वर पोहोचला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकिकडे दिल्लीतील हवेत प्रदूषणाचं प्रमाण वाढलेलं असतानाच दुसरीकडे मुंबईत मात्र अनपेक्षितपणे वायू प्रदुषणाचं हे प्रमाण कमी दिसून आलं. दिल्लीमध्ये तुलनेने प्रदूषणाचं हे प्रमाण सर्वाधिक पाहायला मिळालं. दिवाळीनिमित्त वाजवण्यात आलेले फटाके, वातावरणातील बदल आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये लागणाऱ्या वणव्यामुळे होणारा धूर या साऱ्यामुळे प्रदूषणाचं हे प्रमाण वाढत असल्याचं सांगण्यात येत आहे. 


प्रदूषणामुळे अनेकांना श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे स्थानिक प्रशासनाकडून प्राथमिक पातळीवर काही उपायही योजले गेले. ज्यामध्ये काही पररिसरातील रस्त्यांवर पाणी शिंपडण्यात आलं. 



गेल्या काही दिवसांपासून दिवाळीचा एकंदर माहोल, वातावरणात होणारे बदल या साऱ्यांच्या पार्श्वभूमीवर वायूप्रदुषणाच्या पातळीत चढ- उतार होत असल्याचं चित्र दिसण्याची शक्यता आहे. तेव्हा नागरिकांनी प्राथमिक स्तरावर काळजी घेण्यासोबत प्रदुषणमुक्त दिवाळी साजरा करण्याचं आवाहन करण्यात येत आहे.