Post Office Monthly Saving Scheme: सहसा लग्न झालेल्या मंडळींसमोर एक मोठा प्रश्न असतो तो म्हणजे आर्थिक जुळवाजुळव करण्याचा. वाणसामान, मोबाईल रिचार्ज, वीजबिल आणि इतर सर्व खर्चांसाठी पैशांची जुळवाजुळव करताना अनेकांच्याच नाकीनऊ येतात. महिनाअखेरीस तर, काहींच्या खात्यात इतकी कमी रक्कम असते, की काही गरजाही आवरत्या घ्याव्या लागतात. पण, आता मात्र तुमची दमछाक होणार नाही. कारण, भारतीय पोस्ट खात्याकडून ( Indian Post Office )  विवाहितांसाठी एक अनोखी योजना आखण्यात आली आहे. ज्याअंतर्गत तुम्हाला दर महिन्याला फायदा होणार आहे. सध्याच्या घडीला गुंतवणुकीच्या दृष्टीनं हा सर्वोत्तम पर्याय मानला जात आहे. 


विवाहितांना लॉटरी... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोस्टाकडून (Post office) खास विवाहितांसाठी राबवण्यात आलेल्या या योजनेचं नाव आहे, मंथली सेविंग्स स्कीम (c). यामध्ये तुम्हाला दर महिन्याला काही न काही नफा होणार आहे. यामध्ये तुम्ही एकच खातंही सुरु करु शकता किंवा Join Account ची सुविधाही यामध्ये देण्यात आली आहे. (Account in post office)


पोस्टाकडून खात्यात कसे येणार पैसे... 


लग्न झालेल्या मंडळींनी पोस्टाच्या या योजनेचा फायदा घेण्यासाठी Joint Account सुरु करावं. योजनेमध्ये खातेधारकांच्या वतीनं 9 लाख रुपये गुंतवले जाणं अपेक्षित असेल. ज्यावर 6.6 टक्के इतक्या व्याजदरानं फायदा मिळेल. वार्षिक परताव्याचं सांगावं तर, तुमच्या खात्यात पोस्टाकडून 59400 रुपये Transfer करण्यात येतील. महिन्याला ही रक्कम 4950 रुपये इतकी असेल. 


हेसुद्धा वाचा : Fact Chek : 'या' लिंकवर नोंदणी केल्यास केंद्र सरकारकडून पैसे मिळतात? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?


हिशोब अगदी सोपा... पाहा 


पोस्टाची ही योजना समजून घेण्यासाठीसुद्धा अतिशय सोपी आहे. यामध्ये तुम्हाला एकूण (investment) गुंतवणुकीवर वार्षिक (interest rate) व्याजाचा फायदा होतो. यामध्ये तुम्हाला मिळणारा वार्षिक परतावा आणि त्याचं गणित वार्षिक आकडेमोडीवरच आधारित असतं. गरज नसल्यास तुम्ही ही संपूर्ण रक्कम योजनेच्या अगदी शेवटीच मूळ रकमेच्या स्वरुपात घेऊ शकता.