पोस्ट ऑफिसच्या `या` योजनेत पैसे गुंतवा आणि 5 वर्षात 20 लाखांपर्यंत बचत करा... कसं ते जाणून घ्या
तुम्ही या योजनेमध्ये 100 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता.
मुंबई : जर तुम्ही देखील काही काळात लक्षाधीश होण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुमच्या फायद्याची ही बातमी आहे. सामान्य जनतेचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक प्रकारच्या सरकारी योजना पोस्ट ऑफिसद्वारे चालवल्या जातात. आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या अशा एका विशेष योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही फक्त 5 वर्षात 20 लाख रुपयांचा निधी तयार करू शकता. या योजनेत, तुम्ही फक्त 100 रुपयांच्या छोट्या बचतीसह काही वर्षात लखपती बनू शकता. या सरकारी योजनेला राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र आहे.
एनएससीमध्ये गुंतवणूक केल्याने, आपल्याला खात्रीशीर परतावा तसेच सुरक्षिततेची संपूर्ण हमी मिळते. 5 वर्षात तुम्ही 20 लाख रुपयांचे भांडवल बनवू शकता ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
व्याज 6.8 टक्के दराने उपलब्ध
तुम्ही या योजनेमध्ये 100 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. पोस्ट ऑफिसच्या एनएससी योजनेवर सध्या वार्षिक 6.8 टक्के दराने व्याज मिळत आहे. या योजनेमध्ये गुंतवणूकदारांना चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळतो, जो परिपक्वतावर दिला जातो. या योजनेचा कार्यकाळ 5 वर्षांचा आहे. तसेच, याची परिपक्वता झाल्यावर ती आणखी 5 वर्षे वाढवता येते.
कर लाभ मिळतील
सरकारच्या या योजनेत ग्राहकांना कर लाभांची सुविधाही मिळते. तुम्ही त्यात गुंतवणूक केल्यास तुम्हाला कलम 80 सी अंतर्गत डिडक्शनचा लाभ मिळतो. या विभागाची मर्यादा 1.5 लाख रुपये आहे. याशिवाय व्याजातून मिळणारे उत्पन्न करपात्र आहे. त्यामुळे गुंतवणूकदार परताव्यामध्ये त्याचे व्याज उत्पन्न समाविष्ट करू शकतात.
5 वर्षात संपूर्ण 20.58 लाख रुपये उपलब्ध
जर तुम्हाला या योजनेअंतर्गत 5 वर्षात 20.58 लाखांचा निधी उपलब्ध करायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला 5 वर्षात 15 लाख रुपये गुंतवावे लागतील. त्याचबरोबर व्याजाद्वारे तुम्हाला 6 लाख रुपयांचा लाभ मिळेल. यामध्ये चक्रवाढ व्याज 6.8 टक्के दराने उपलब्ध होईल.
5 वर्षांनंतर व्याजाचा लाभ किती असेल?
एनएससी कॅल्क्युलेटरनुसार, जर तुम्ही या योजनेत फक्त 1 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला व्याजाद्वारे 5 वर्षानंतर 1लाख 38 हजार 949 रुपये मिळतील. याशिवाय 2 लाखांच्या गुंतवणुकीवर 2 लाख 77 हजार 899 रुपये उपलब्ध होतील. 5 लाखांच्या गुंतवणुकीवर 6 लाख 94 हजार 746 रुपये उपलब्ध आहेत.
योजनेची काही माहिती थोडक्यात
भारतातील कोणताही नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकतो.
तुम्ही त्यात पोस्ट ऑफिसच्या कोणत्याही शाखेतून गुंतवणूक करू शकता.
या व्यतिरिक्त, अनिवासी भारतीय (NRIs) देखील NSC मध्ये समाविष्ट आहेत.