Post Office: या सरकारी योजनेत 7500 रुपये गुंतवा! व्हाल करोडपती, अधिक जाणून घ्या
PPF Calculation:अनेकांचे स्वप्न असते आपणही करोडपती व्हावे. मात्र, त्यासाठी खूप कष्ट करण्याची गरज असते. परंतु सरकारी योजनेत काही पैसे गुंतवले तर तुम्ही करोडपती होऊ शकता. Public Provident Fundमध्ये तुम्हाला जास्त गुंतवणूक करण्याची गरज नाही, दर महिन्याला केवळ काही रुपये गुंतवले की काम झालं.
PPF Calculation: अनेकांना पैसे बचत करण्याची सवय असते तर काहींना गुंतवणूक करुन पैसे वाढवायचे असतात. जर तुम्हालाही करोडपती व्हायचे असेल तर मोठी संधी आहे. सरकारी योजनेत पैसे गुंतवले तर तुम्ही करोडपती होऊ शकता. आजपासूनच गुंतवणूक करायला सुरुवात करा. यासाठी तुम्हाला जास्त गुंतवणुकीची गरज नाही, तर दर महिन्याला सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये (Public Provident Fund) केवळ 7500 रुपये गुंतवले तर निवृत्तीपूर्वीच (Retirement) तुम्ही करोडपती व्हाल.
दीर्घकालीन गुंतवणूक
भविष्यासाठी गुंतवणूक हा चांगला पर्याय आहे. मात्र, गुंतवणूक कोठे करावी, याचा विचार करुन गुंतवणूक केली पाहिजे. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (Public Provident Fund) हा एक चांगला पर्याय आहे, ज्यामध्ये तुम्हाला खूप चांगला परतावा मिळतो. PPF मध्ये, तुम्ही एका वर्षात 1.5 लाख रुपये, म्हणजेच 12,500 रुपये दरमहा गुंतवणूक करु शकता. जर तुम्हाला करोडपती व्हायचे असेल तर तुम्हाला दर महिन्याला किती गुंतवणूक करावी लागेल आणि किती काळासाठी हे माहित असणे आवश्यक आहे.
PPF वर 7.1 टक्के व्याज मिळते
सध्या सरकार पीपीएफ खात्यावर (Public Provident Fund) 7.1 टक्के वार्षिक व्याज देते. यामध्ये 15 वर्षांसाठी गुंतवणूक केली जाते. त्यानुसार, महिन्यासाठी 12500 रुपयांच्या गुंतवणुकीचे एकूण मूल्य 15 वर्षांनी 40,68,209 रुपये होईल. यामध्ये एकूण गुंतवणूक 22.5 लाख रुपये असून व्याज 18,18,209 रुपये आहे.
अशा प्रकारे एक कोटी रुपयांचा निधी जमा होईल
प्रकरण क्रमांक-1
- तुमचे वय 30 वर्षे आहे आणि तुम्ही PPF मध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे
- 12500 रुपये दर महिना 15 वर्षांपर्यंत PPF मध्ये जमा केल्यानंतर तुमच्याकडे 40,68,209 रुपये असतील.
- तुम्ही पैसे काढण्याचा विचार करु नका तर PPFला 5-5 वर्षांनी पुढे वाढवा.
- म्हणजेच 15 वर्षांनंतर 5 वर्षे गुंतवणूक केली तर ती 20 वर्षांनी ही रक्कम असेल 66,58,288 रुपये होईल.
- जेव्हा 20 वर्षांनंतर आणखी 5 वर्षे गुंतवणूक केली तर 25 वर्षांनी रक्कम 1,03,08,015 रुपये होईल.
तर अशा प्रकारे तुम्ही व्हाल करोडपती
तुम्ही करोडपती झाला आहात. म्हणजेच, जर तुम्ही वयाच्या 30 व्या वर्षी पीपीएफमध्ये दरमहा 12500 रुपये गुंतवले तर २५ वर्षांनी म्हणजेच वयाच्या ५५ व्या वर्षी तुम्ही करोडपती व्हाल. PPF खात्याची मॅच्युरिटी 15 वर्षे आहे. जर हे खाते 15 वर्षांसाठी वाढवायचे असेल, तर हे खाते पुढील वर्षांसाठी पाच वर्षांसाठी वाढवता येईल.
प्रकरण क्रमांक-2
जर तुम्हाला PPF मध्ये 12500 रुपयांऐवजी थोडी कमी रक्कम गुंतवायची असेल, परंतु वयाच्या 55 व्या वर्षी करोडपती व्हायचे असेल तर तुम्हाला थोडे आधी सुरुवात करावी लागेल.
- समजा वयाच्या 25 व्या वर्षी तुम्ही तुमच्या PPF खात्यात दर महिन्याला 10,000 रुपये टाकायला सुरुवात केली.
- 7.1 टक्के नुसार, 15 वर्षांनंतर तुमचे एकूण गुंतवणूक 32,54,567 रुपये होईल.
- आता ते पुन्हा 5 वर्षांसाठी वाढवा, नंतर 20 वर्षांनी एकूण गुंतवणूक 53,26,631 रुपये होईल.
-ते पुन्हा 5 वर्षांसाठी वाढवा, 25 वर्षांनंतर एकूण गुंतवणूक 82,46,412 रुपये होईल.
- हे पैसे पुन्हा 5 वर्षांसाठी वाढवत गेलो तर 30 वर्षांनंतर एकूण गुंतवणूक 1,23,60,728 रुपये होईल.
- म्हणजेच वयाच्या 55 व्या वर्षी तुम्ही करोडपती व्हाल.
केस क्रमांक 3
तुम्ही 10,000 रुपयांऐवजी केवळ 7500 रुपये दरमहा जमा केले तरीही तुम्ही वयाच्या 55 व्या वर्षी करोडपती व्हाल, परंतु तुम्हाला वयाच्या 20 व्या वर्षी गुंतवणूक सुरु करावी लागेल.
- जर तुम्ही PPF मध्ये 7500 रुपये 7.1 टक्के व्याजाने 15 वर्षांसाठी जमा करत राहिल्यास, एकूण गुंतवणूक 24,40,926 रुपये होईल.
- 5 वर्षांनंतर, म्हणजेच 20 वर्षांनंतर ही रक्कम 39,94,973 रुपये होईल
- 5 वर्षे आणि ती पुढे वाढवल्यानंतर म्हणजेच 25 वर्षांनी ही रक्कम 61,84,809 रुपये होईल.
- 5 वर्षांनी पुन्हा कॅरी फॉरवर्ड केल्यावर, 30 वर्षांनंतर ही रक्कम वाढून 92,70,546 रुपये होईल
- 5 वर्षे आणखी वाढ वली तर 35 वर्षांनंतर रक्कम असेल1,36,18,714 रुपये होईल.
- म्हणजेच, जेव्हा तुम्ही 55 वर्षांचे व्हाल तेव्हा तुमच्याकडे एक कोटींपेक्षा जास्त रक्कम असेल. लक्षाधीश बनण्याची युक्ती म्हणजे PPF च्या चक्रवाढीचा फायदा घेणे, लवकर गुंतवणूक करणे आणि संयमाने गुंतवणूक करणे होय.