114 महिन्यांत दुप्पट होईल पैसा; पोस्टाच्या `या` योजनेत गुंतवणूक केल्यास फायदाच
Post Office Time Deposit: गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पर्याय शोधताय. तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय पोस्टाची बेस्ट योजना
Post Office Time Deposit: आपल्या कमाईचा काही हिस्सा गुंतवणुकीसाठी काढून ठेवतो. बँकांमध्ये एफडी असो किंवा सोन्यातील गुंतवणूक विविध माध्यमातून सामान्य नागरिक पुढील भविष्यासाठी गुंतवणुक करु शकतो. अलीकडे गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पण तरी देखील अजूनही सरकारी संस्थांमध्ये जास्त विश्वास ठेवला जातो. पोस्ट ऑफिसही नागरिकांसाठी गुंतवणुकीच्या विविध योजना घेऊन आल्या आहेत. यात नागरिकांना गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळत आहे. पोस्ट ऑफिसची स्मॉल सेव्हिंग स्कीम सगळ्यात जास्त लोकप्रिय आहे. त्याचबरोबर, Post Office Time Deposit Scheme यात गुंतवणुक केल्यास रक्कम दुप्पट होणार आहे. त्याचबरोबर व्याजदरदेखील चांगला आहे. या योजनेचे फायदे आणि अकाउंट सुरू करण्याबाबतत सर्व काही जाणून घेऊया.
Post Office Saving Schemes हा गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पर्याय आहे. पोस्टाच्या टाइम डिपॉजिट स्कीमला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळणार आहे. कारण या योजनेअंतर्गंत ग्राहकांचे पैसे दुप्पट होऊ शकतात. तर गुंतवणुकदारांना बँकेच्या तुलनेत जास्त व्याजदर मिळत आहे. सरकारकडून या योजनेत गुंतवणुक करणाऱ्या ग्राहकांना 7.5 टक्के व्याजदर मिळत आहे.
पोस्ट ऑफिसच्या या बचत योजनेत विविध कालावधीपर्यंत गुंतवणुक करु शकता. यात 1 वर्ष, 2वर्ष, 3 वर्ष आणि 5 वर्षांपर्यंत पैसे जमा करु शकता. एक वर्षांपर्यंत गुंतवणुक केल्यास 6.9 टक्क्यांपर्यंत व्याज मिळू शकते. तर, 2 किंवा 3 वर्षांपर्यंत पैसे गुंतवल्यास 7 टक्क्यांपर्यंत व्याज मिळू शकेल. त्याचबरोबर 5 वर्षांसाठी पोस्टात गुंतवणूक केल्यास Time Depositच्या योजनेअंतर्गंत 7.5 टक्क्यांपर्यंत व्याजदर मिळणार आहे. ग्राहकांची रक्कम दुप्पट होण्यासाठी पाच वर्षांपर्यंतचा कालावधी लागणार आहे.
पैसे दुप्पट होण्यास किती वर्ष लागतील?
पोस्ट ऑफिसच्या या योजनेत पैसे गुंतवल्यास पैसे दुप्पट होण्याचे गणित समजून घेतले तर, पाच वर्षांसाठी पाच लाख रुपये गुंतवणे गरजेचे आहे. यावर 7.5 टक्क्यांनी व्याजदर मिळेल. तुम्ही गुंतवलेल्या रकमेवर 2,24,975 रुपयांचे व्याज तुम्हाला मिळेल आणि गुंतवणुक केलेली रक्कम मॅच्युरिटीच्या वेळी 7,24,974 इतकी होईल. जर टाइम डिपॉझिट स्कीममध्ये गुंतवलेले पैसे 9.6 वर्षांसाठी गुंतवले तर तुम्हाला जमा केलेल्या रकमेच्या दुप्पट मिळेल. म्हणजे 114 महिन्यांच्या गुंतवणुकीनंतर पैसे दुप्पट होतील.
टाईम डिपॉझिट स्कीममध्ये, ग्राहकाला आयकर विभाग कायदा 1961 च्या कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ देखील दिला जातो. या बचत योजनेत सिंगल अकाउंट किंवा संयुक्त खाते उघडता येते. 10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलाचे खाते त्याच्या कुटुंबातील सदस्याद्वारे उघडता येते. यामध्ये किमान 1,000 रुपयांमध्ये खाते उघडता येते. ज्यामध्ये व्याजाचे पैसे वार्षिक आधारावर जोडले जातात.