कर्नाटक : वीज खंडीत होण्याच्या समस्या शेतकऱ्यांपासून सर्वसामान्यांना सोसाव्या लागतायत. शेतकऱ्यांची शेतीची कामे होत नाहीयेत, व्यापाऱ्यांचे काम ठप्प झालेत, नोकरदार वर्गाला वर्क फ्रॉम होम करता येत नाहीए. त्यामुळे सर्वच वैतागलेत. अशाच वैतागलेल्या एका सर्वसामान्य व्यक्तीने थेट वीज अधिकाऱ्यांना मोठा शॉक दिलाय. त्याच्या या शॉकनंतर प्रशासन जागे झालेय.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्नाटकातील शिवमोग्गा येथे वीज खंडित झाल्याने सर्वचं नागरीक वैतागलेले आहेत. एम हनुमंतप्पा देखील या त्रासाने कंटाळला आहे. हनुमंतप्पाच्या कुटुंबाला दिवसातून फक्त 3-4 तास वीज मिळते. बाकीचा दिवस असाच वाया जातो. त्यामुळे त्याची अनेक कामे होत नाही. या प्रकणावरून वैतागलेल्या हनुमंतप्पाने घरात वीज नसल्याची तक्रार दाखल केली. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. या प्रकरणावरून एका वीज अधिकारी आणि त्याच्यात जोरदार वादही झाला. 


'घरी मसाले दळून जेवण कसे बनवायचे? फोन चार्ज कसा करायचा ही मूलभूत गरज आहे. या कामांसाठी मी दररोज माझ्या शेजाऱ्याच्या घरी जाऊ शकत नसल्याचा संताप हनुमंतप्पा यांनी वीज अधिकाऱ्यांसमोर व्यक्त केला होता. यावर अधिकाऱ्याने उद्धटपणे मग मेस्कॉमच्या ऑफिसमध्ये जा आणि तिथे जाऊन मसाला दळून घ्या, असा सल्ला दिला. 


मिक्सर घेऊन पोहोचला कार्यालयात 
 हनुमंतप्पाने हा सल्ला गांभिर्याने घेत वीज अधिकाऱ्यांनाच शॉक देण्याचा निश्चय केला. आणि हनुमंतप्पा आपली दररोजची कामे करण्यासाठी मिक्सर आणि फोन चार्जर घेऊन मंगळुरू वीज विभागाच्या कार्यालयात पोहोचला. या कार्यालयात हनुमंतप्पा दररोज येऊन मिक्सरवर मसाला वाटतो आणि आपल फोन चार्ज करून इतर काम करून घरी जातो. एका रिपोर्टनुसार, एम हनुमंतप्पा तब्बल 10 महिन्यापासून वीज विभागाच्या कार्यालयात जाऊन हे काम करतोय.  


वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन 
हनुमंतप्पा यांच्या या वैयक्तिक आंदोलनाचा वीज अधिकाऱ्यांनी चांगलाच शॉक घेतला. मेस्कॉमच्या एका कनिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, पावसामुळे आयपी सेट चार्ज करता येत नाहीत. मात्र, त्यांनी हनुमंतप्पा यांच्या घरी महिनाभरात वीज पोहोचवण्याचे आश्वासन दिले.