SBIच्या ग्राहकांचे टेन्शन दूर होणार; PPF अकाउंटसंदर्भात आली मोठी अपडेट
PPF Account Open: पीपीएफ अकाउंट सुरू करण्यासाठी बँकेत जावे लागते. मात्र, तुम्ही घरबसल्याही आता पीपीएफ अकाउंट सुरू करु शकता.
Public Provident Fund: तुमचं देखील स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (SBI) खाते आहे आणि तुम्हाला पीपीएफ (PPF) अकाउंट सुरू करायचे आहे. तर, तुमच्यासाठी ही महत्त्त्वाची बातमी आहे. बँकेकडून आता ऑनलाइन पब्लिक प्रोव्हिडेंट फंड अकाउंट (PPF Account) सुरू करण्याची संधी देण्यात येत आहे. त्यामुळं आता पीपीएफ अकाउंट सुरू करण्यासाठी बँकांमध्ये फेऱ्या मारण्याची गरज नाहीये. फक्त ऑनलाइच काही स्टेप्स फॉलोकरुन तुम्ही आरामात पीपीएफ अकाउंट सुरू करु शकता. त्याव्यतिरिक्त तुम्ही पोस्ट ऑफिसमध्येही पीपीएफ अकाउंट सुरू करु शकता.
दरवर्षी 7.1 टक्के व्याजदर
पीपीएफ अकाउंट 15 वर्षांनी मॅच्युअर होते. यावर ग्राहकांना 7.1 टक्क्यांपर्यंत व्याजदराने परतावा मिळतो. ऑनलाइन पीपीएफ अकाउंट सुरू करण्यासाठी तुमच्या सेव्हिंग अकाउंटची केवायसी असणे गरजेचे आहे. पीपीएफमध्ये तुम्हाला प्रत्येक वर्षी 500 रुपयांची गुंतवणूक करणे गरजेचे तर जास्तीत जास्त तुम्ही 1,50,000 रुपयांपर्यंत गुंतवणुक करु शकता.
SBIमध्ये कसं सुरू कराल पीपीएफ अकाउंट
1) सगळ्यात पहिले एसबीआय (SBI) अकाउंटमध्ये लॉगइन करा
2) आता 'Request and enquiries' टॅबवर क्लिक करा
3) ड्रॉप डाउन मेन्यूमध्ये 'New PPF Accounts’ पर्यायावर क्लिक करा
4) 'New PPF Accounts’ वर गेल्यानंतर तिथे PAN आणि अन्य डिटेल टाका
5) जर तुम्ही अल्पवयीन व्यक्तीचे अकाउंट काढत असाल तर त्या टॅबवर क्लिक करा
6) तुमच्या नावाने अकाउंट सुरू करायचे असल्यास तुमच्या ब्रँचचा कोड टाका जिथे तुम्ही पीपीएफ अकाउंट सुरू करत आहात.
7) त्यानंतर तिथे तुमचे पर्सनल डिटेल, पत्ता, नॉमिनीसंबंधीत सर्व माहिती टाकून त्याची पडताळणी करा त्यानंतर प्रोसीडवर क्लिक करा.
8) सबमिट केल्यानंतर एका डायलॉग बॉक्समध्ये लिहलेली असेल की 'Your form has been successfully submitted म्हणजे तुमचा फॉर्म यशस्वीरित्या भरला गेला आहे.
9) आता तुम्ही तो फॉर्म डाउनलोड करुन घ्या
10) ‘प्रिंट पीपीएफ ऑनलाइन अर्ज’ टॅबमधून खाते उघडण्याचा फॉर्म प्रिंट करा. खाते उघडल्याच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत केवायसी दस्तऐवज आणि एक फोटोसह शाखेत जा.
ऑनलाइन अकाउंट सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे
ऑनलाइन पीपीएफ अकाउंट सुरू करण्यासाठी तुमचा आधार नंबर एसबीआयच्या सेव्हिंग अकाउंटसोबत लिंक असणे गरजेचे आहे. त्याव्यतिरिक्त मोबाइल नंबर आधारकार्डसोबत लिंक असणे गरजेचे आहे तसंच अॅक्टिव्ह मोडवर असायला पाहिजे.