PPF मध्ये सरकारने केले 5 मोठे बदल, पैसे जमा करण्यापूर्वी जाणून घ्या
तुमचेही पीपीएफ खाते असेल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. सर्व ठेव योजनांचे नियम सरकार वेळोवेळी बदलत असतात.
मुंबई : पीपीएफ खात्यात तुमचे योगदान 50 रुपयांच्या पटीत असायला हवी. ही रक्कम एका वर्षात किमान 500 रुपये किंवा त्याहून अधिक असावी. परंतु PPF खात्यात जमा केलेली रक्कम वर्षभरात 1.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावी. याशिवाय, आता तुम्ही महिन्यातून एकदाच पीपीएफ खात्यात पैसे जमा करू शकता.
पीपीएफ खाते उघडण्यासाठी आता फॉर्म A ऐवजी फॉर्म-1 सबमिट करावा लागेल. PPF खाते 15 वर्षांनंतर एक वर्ष वाढवण्यासाठी, एखाद्याला फॉर्म H ऐवजी फॉर्म-4 मध्ये अर्ज करावा लागेल.
तुम्ही तुमचे पीपीएफ खाते 15 वर्षांनंतरही पैसे जमा न करता सुरू ठेवू शकता. यामध्ये पैसे जमा करण्याचे तुमच्यावर कोणतेही बंधन नाही. मॅच्युरिटीनंतर, जर तुम्ही पीपीएफ खाते चालू ठेवत असाल, तर एका आर्थिक वर्षातून तुम्ही एकदाच पैसे काढू शकता.
पीपीएफमध्ये जमा केलेल्या रकमेवर कर्ज घेतल्यास व्याजदर दोन टक्क्यांवरून एक टक्का करण्यात आला आहे. कर्जाची मूळ रक्कम भरल्यानंतर, तुम्हाला दोनपेक्षा जास्त हप्त्यांमध्ये व्याज भरावे लागेल. दर महिन्याच्या 1 तारखेपासून व्याज मोजले जाते.
जर तुम्हाला पीपीएफ खात्यावर कर्ज घ्यायचे असेल, तर अर्जाच्या तारखेच्या दोन वर्षे अगोदर, तुम्ही खात्यातील उपलब्ध पीपीएफ शिल्लक रकमेच्या 25 टक्केच कर्ज घेऊ शकता.
उदाहरणार्थ, तुम्ही 31 मार्च 2022 रोजी अर्ज केला होता. या तारखेच्या दोन वर्षांपूर्वी म्हणजे 31 मार्च 2019 रोजी, जर तुमच्या PPF खात्यात 1 लाख रुपये असतील, तर तुम्हाला 25 टक्के कर्ज मिळू शकते.