PPF खातेधारकांसाठी महत्वाची बातमी! येत्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांकडून या मोठ्या निर्णयाची शक्यता
ppf latest news : भारतीय चार्टर्ड अकाउंटंट्स संस्थेने (ICAI) 1 फेब्रुवारी 2022 रोजी सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी PPF मधील गुंतवणुकीची मर्यादा 3 लाख रुपये करण्याची शिफारस केली आहे.
नवी दिल्ली: केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 सादर होण्यास आता एका महिन्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे आणि स्टेकहोल्डर्सव्यतिरिक्त, राज्यांच्या अर्थमंत्र्यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना आपल्या शिफारसी पाठवल्या आहेत. दरम्यान, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) ने PPF ची कमाल वार्षिक ठेव मर्यादा 3 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याची शिफारस केली आहे. या वर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशन 1 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या दिवशी संसदेत वार्षिक अर्थसंकल्प सादर करणार आहेत. (Annual limit for contribution to PPF be increased to Rs 3 )
ICAI ची शिफारस
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स (ICAI) ने अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) मधील गुंतवणुकीची कमाल मर्यादा सध्याच्या 1.5 लाख रुपयांवरून 3 लाख रुपये करण्याची सूचना केली आहे.
'पीपीएफ सुरक्षित आणि कर प्रभावी बचत योजना'
ICAI ने शिफारसीमध्ये म्हटले आहे की PPF ची ठेव मर्यादा वाढवणे आवश्यक आहे, कारण ही एकमेव सुरक्षित आणि कर-प्रभावी बचत योजना आहे.
ICAI ने असेही म्हटले आहे की त्यांचा विश्वास आहे की PPF ठेव मर्यादा वाढल्याने GDP च्या टक्केवारीच्या रूपात घरगुती बचतीला चालना मिळेल आणि त्याचा महागाईविरोधी प्रभाव पडेल.
ICAI च्या प्रमुख शिफारसी
PPF मध्ये योगदानाची वार्षिक मर्यादा सध्याच्या 1.5 लाख रुपयांवरून 3 लाख रुपये करण्यात यावी.
कलम CCF अंतर्गत कपातीची कमाल मर्यादा 1.5 लाख रुपयांवरून 3 लाख रुपये केली जाऊ शकते.
लोकांना मोठ्या प्रमाणात बचतीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी कलम 80C अंतर्गत कपातीची रक्कम रु. 1.5 लाख वरून 2.5 लाख रूपये होऊ शकते.
केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 1 फेब्रुवारी 2022 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत सादर करतील.