मुंबई : केंद्र सरकारने छोट्या बचत योजनांमध्ये (पीपीएफ, एनएससीवरील व्याज दर) गुंतवणूक करणाऱ्यांसाठी विशेष भेट दिली आहे. ऐन सणामध्ये सरकारने या योजनांच्या व्याज दरामध्ये (पीपीएफवरील व्याज दर, एनएससी) कोणताही बदल केलेला नाही. छोट्या बचत योजनांना पूर्वीप्रमाणेच अधिक व्याज मिळणार आहे. या योजनांमध्ये पोस्ट ऑफिसच्या सर्व लहान बचत योजना आणि पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजना, एनएससी (पीपीएफवरील व्याज दर), एनएससी या योजनांचा समावेश आहे. मागील तिमाहीप्रमाणेच गुंतवणुकीवरही आपल्याला तितकेच व्याज मिळेल. सरकार लहान बचत योजनांचे व्याज दर तिमाहीच्या आधारे ठरवते. १ ऑक्टोबर २०१९ ते ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत फक्त जुनेच दर लागू राहणार आहेत.


छोट्या बचत योजनांचे व्याज दर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीच्या दरात कोणताही बदल न झाल्यास कोणत्या योजनेवर किती व्याज दिले जाईल.


- सुकन्या समृद्धि योजना - ८.४ टक्के
- ज्येष्ठ नागरिक योजना (एससीएसएस) - ८.६ टक्के
- सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) - ७.९ टक्के
- राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे (एनएससी) - ७.९  टक्के


पोस्ट ऑफिसच्या कोणत्या योजनेवर किती व्याज


बँकेसह पोस्ट ऑफिसमध्ये ज्येष्ठ नागरिक बचत योजना, पीपीएफ आणि सुकन्या समृध्दी योजना उघडता येईल. या व्यतिरिक्त एक ते तीन वर्षांच्या पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेवींवर ६.९ टक्के व्याज दिले जाणार आहे.


त्याचबरोबर पाच वर्षांच्या मुदतीच्या ठेवींसाठी ७.७ टक्के व्याज मिळणार आहे. पोस्ट ऑफिसच्या पाच वर्षांच्या आवर्ती ठेवीवर (आरडी) ७.२ टक्के व्याज मिळेल. पोस्ट ऑफिसच्या पाच वर्षांच्या मासिक उत्पन्न योजनेवर (एमआयएस) ७.६ टक्के व्याज मिळेल. त्याचबरोबर किसान विकास पत्र (केव्हीपी) वर ग्राहकांना ७.६ टक्के व्याज मिळेल.