PMMY Mudra Loan Scheme: आपला स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याची अनेकांची इच्छा असते. मात्र व्यवसायासाठी आवश्यक भांडवल उभं प्रत्येकाला जमतं असं नाही. यासाठी कर्ज घेण्याची वेळ येते. मात्र विना गॅरंटी कर्ज मिळणं कठीण आहे. पण पंतप्रधान मुद्रा योजनेंतर्गत (PMMY) तुम्ही कर्ज घेऊ शकता. ही योजना पंतप्रदान नरेंद्र मोदी यांनी 2015 साली सुरु केली होती. या योजनेंतर्गत दहा लाखापर्यंत कोलॅटरल फ्री लोन दिलं जातं. म्हणजेच यासाठी काहीच तारण ठेवण्याची आवश्यकता नाही. हे कर्ज नॉन कॉरपोरेट आणि गैर कृषि कामांसाठी दिलं जातं. हे कर्ज तीन प्रकारात उपलब्ध आहे. पहिलं म्हणजे शिशु कर्ज, यात 50 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळते. दुसरं म्हणजे किशोर कर्ज 5 लाखापर्यंत लोन दिलं जातं. तिसरं म्हणजे तरुण कर्ज, यात 10 लाखापर्यंत लोन दिलं जातं.  तुम्ही तुमच्या गरजेनुसार योजना निवडू शकता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्ज कसा करायचा


  • मुद्रा योजनेच्या अधिकृत वेबसाइट mudra.org.in वर जा.

  • वेबसाईटच्या होम पेजवर शिशू, किशोर आणि तरुण या तीन प्रकारच्या कर्जाबद्दल माहिती आहे.

  • त्यापैकी तुम्हाला आवश्यक असलेल्या पर्यायाची निवड करा.

  • पर्यायावर क्लिक केल्यानंतर तेथून अर्ज डाउनलोड करा आणि अर्जाची प्रिंट काढा.

  • अर्ज योग्यरित्या भरा आणि आधार कार्ड, पॅन कार्ड, कायमस्वरूपी आणि व्यवसायाच्या पत्त्याचा पुरावा, आयकर रिटर्न आणि सेल्फ टॅक्स रिटर्नची प्रत आणि पासपोर्ट आकाराचा फोटो जोडा.

  • हा अर्ज तुमच्या जवळच्या बँकेत जमा करा. बँक तुमच्या अर्जाची पडताळणी करेल आणि कर्ज 1 महिन्याच्या आत दिले जाईल.

  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, तुम्हाला युजर आणि पासवर्ड तयार करावा लागेल. त्याच्या मदतीने मुद्रा कर्जाच्या वेबसाइटवर लॉगिन करा. येथे तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.


SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, वयोमर्यादा, पात्रता आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख जाणून घ्या


या बँकांकडून मिळेल कर्ज


तुम्ही या कर्जासाठी सरकारी किंवा खासगी बँका, ग्रामीण बँका, लघु वित्त बँका, गैर-वित्तीय कंपन्या या ठिकाणी अर्ज करू शकता. कर्जाची एकूण परतफेड कालावधी 12 महिने ते 5 वर्षांपर्यंत आहे. व्याजदर अर्जदाराच्या प्रोफाइल आणि व्यावसायिक गरजांवर आधारित आहे.