`माझ्या आईवर बलात्कार..माझेही कपडे उतरवले...` प्रज्वल रेवन्ना स्कॅंडलमध्ये पीडितेचा धक्कादायक खुलासा
Prajwal Revanna Sex scandal: 2020 ते 2021 दरम्यान प्रज्वलने मला व्हिडीओ कॉल केला आणि त्याचे उत्तर द्यायला भाग पाडल्याचे पीडितेने म्हटले.
Prajwal Revanna Sex scandal: कर्नाटकमध्ये चर्चेत असलेल्या सेक्स स्कॅंडल केसमध्ये एका पीडितेने पुढे येऊन आपल्यासोबत घडलेली आपबीती सांगितली आहे. तिने जेडीएसमधून हकालपट्टी करण्यात आलेले नेते प्रज्वल रेवन्ना आणि त्याचे वडील एचडी रेवन्ना यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. प्रज्वलने 4 ते 5 वर्षांपुर्वी आपल्या बंगळूर येथील घरी माझ्या आईवर बलात्कार केला. यानंतर माझं देखील लैंगिक शोषण केलं, असे तिने सांगितले. पीडित तरुणीची ओळख एसआयटीने गुप्त ठेवली आहे. तिने प्रज्वलच्या विरोधात विस्तृत माहिती दिली आहे.
2020 ते 2021 दरम्यान प्रज्वलने मला व्हिडीओ कॉल केला आणि त्याचे उत्तर द्यायला भाग पाडले. एवढेच नव्हे तर मला आणि माझ्या आईला धमकी दिली. व्हिडीओ कॉलवर कपडे उतरवायला सांगितले. यासोबतच पीडितेने प्रज्वल रेवन्नाचे वडील एचडी रेवन्ना यांच्यावरदेखील गंभीर आरोप केले.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेने एसआयटीला सांगितले की, तो (प्रज्वल) मला फोन करायचा आणि कपडे उतरवायला सांगायचा. तो माझ्या आईच्या मोबाईलवरही फोन करायचा आणि मला कॉल उचलण्यासाठी भाग पाडायचा. मी विरोध केल्यावर त्याने माझ्या आईला धमकी दिली. आमच्या परिवाराला याबद्दल समजले. त्यांनी आम्हाला साथ दिली. यानंतर आम्ही त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली.
'बलात्काराचा व्हिडीओ बनवल्याची माहिती नव्हती'
शोषण केल्याप्रकरणी कोणाला सांगू नको अशी धमकी प्रज्वलने दिल्याचे पीडितेने म्हटले. तसेच बंगळुरुच्या बसवनागुडी येथील त्याच्या घरी माझ्या आईवर बलात्कार केला. त्याचा व्हिडीओ बनवला गेलाय, याची माहिती आम्हाला नव्हती. व्हिडीओ व्हायरल झाला पण आम्ही पाहिला नाही. पोलिसांनी तो व्हिडीओ आम्हाला दाखवला, ज्यामध्ये प्रज्वलचा चेहरा दिसत होता, असे त्या म्हणाल्या.
'माझेदेखील लैंगिक शोषण'
एचडी रेवन्ना आणि प्रज्वल रेवन्ना यांनी माझ्या आईवर बलात्कार, लैंगिक शोषण केल. प्रज्वलने माझेदेखील लैंगिक शोषण केले. जर तू मला सहकार्य केले नाहीस तर तुझ्या नवऱ्याला नोकरीवरुन काढेन, त्याला बेरोजगार करेन..तसेच तुझ्या मुलीवर देखील बलात्कार करेन, अशी धमकी प्रज्वलने माझ्या आईला दिली होती, असे पीडितेने म्हटले.