पर्यावरण मंत्री इलेक्ट्रीक कारने, तर २ खासदार सायकलने पोहोचले संसदेत
संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु
नवी दिल्ली : संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु झालं आहे. भारताची राजधानी दिल्लीमध्ये सध्या प्रदुषणामुळे लोकं हैराण आहेत. त्यातच आज केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर हे इलेक्ट्रीक कार घेऊन संसदेत पोहोचले. तर मनोज तिवारी सायकलवर संसदेत पोहोचले. मनोज तिवारी यांना सायकलवर येताना पाहून अनेक लोकांनी त्यांना पाहण्यासाठी गर्दी केली.
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं की, ही इलेक्ट्रीक कार त्यांनी २ आठवड्यापूर्वीच खरेदी केली आहे. अशा त्यांच्याकडे ४ गाड्या आहेत. या इलेक्ट्रीक कारमुळे प्रदुषण खूपच कमी होतं. प्रदुषण कमी करण्य़ासाठी प्रयत्न सुरु आहेत. ईस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेस-वे बनवण्यात आला आहे. त्या दिशेने टाकलेलं हे एक पाऊल आहे.
दुसरीकडे काँग्रेस खासदार गौरव गोगोई हे मास्क घालून संसदेतील गांधीच्या प्रतिमेसमोर आंदोलन केलं. दिल्लीत प्रदुषण वाढल्यामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. असं त्यांनी म्हटलं आहे.
गुजरातमधून भाजपचे खासदार मनसुख मांडविय हे देखील सायकलवर संसदेत पोहोचले.