नवी दिल्ली: प्रणव मुखर्जी यांची राजकारणात परतण्याची कुठलीही योजना नाही, असं त्यांची मुलगी शर्मिष्ठा मुखर्जी यांनी स्पष्ट केलंय. २०१९ ला त्रिशंकू लोकसभा निर्माण झाल्यास, प्रणव मुखर्जी हे सर्वसहमतीनं पंतप्रधान होऊ शकतात, त्या दृष्टीनंच प्रणव मुखर्जींना नागपुरातल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात बोलावण्यात आलं असण्याची शक्यता आहे, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी झी २४ तासच्या मुक्तचर्चा या कार्यक्रमात केलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राउत यांच्या वक्तव्यानंतर देशभरात यासंदर्भातली चर्चा सुरू झाली होती. पण भारताचे राष्ट्रपती म्हणून निवृत्त झाल्यानंतर माझ्या वडिलांची राजकारणात परतण्याची कुठलीही योजना नाही, असं ट्विट करुन शर्मिष्ठा मुखर्जी यांनी या चर्चेला लगाम घातलाय. शर्मिष्ठा मुखर्जी या दिल्ली प्रदेश काँग्रेसच्या प्रवक्त्या आहेत.  शर्मिष्ठा मुखर्जींनी काय ट्विट केलंय.


संजय राऊत नेमकं काय म्हणाले होते. पाहुया....