पाटणा: निवडणूक जिंकण्यासाठी अचूक रणनीती आखण्यात माहीर असलेल्या प्रशांत किशोर यांनी रविवारी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या उपस्थितीत संयुक्त जनता दलात प्रवेश केला. बिहारमधून नव्या प्रवासाला सुरुवात करण्यासाठी मी खूपच उत्साही असल्याचे ट्विट त्यांनी केले. पाटणातील जेडीयूच्या कार्यकारिणीच्या बैठकीत नितीशकुमार यांनी किशोर यांना पक्षाचे सदस्यत्व दिले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०१४ साली भाजपला मिळालेल्या अभूतपूर्व यशात प्रशांत किशोर यांच्या निवडणूक व्यवस्थापनाचा मोठा वाटा होता. यानंतर बिहार विधानसभेच्या निवडणुकीतही प्रशांत किशोर यांनी या कामगिरीची पुनरावृत्ती केली होती. देशभरात मोदी लाट जोमात असताना नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांनी सहजरित्या थोपवून धरली. त्यामुळे बिहारमध्ये जेडीयू, आरजेडी आणि काँग्रेसची महाआघाडी प्रचंड मतांनी विजयी झाली. 


मात्र, २०१७ मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेससाठी काम करणाऱ्या प्रशांत किशोर यांना लौकिकाला साजेशी कामगिरी करायला जमली नव्हती.