मुंबई : जनता दल युनायटेडचे प्रमुख नितीश कुमार यांनी प्रशांत किशोर यांना पार्टीतून बाहेरचा रस्ता दाखवला. भाजपासोबत जागांची वाटाघाटी झाल्याने हे पाऊल उचलल्याचा राजकीय अर्थ काढला जात आहे. जर भाजप आणि लोजपा एकत्र असतील आणि समोर तेजस्वी यादव सारखे नेता असतील तर प्रशांत किशोर किंवा कोणत्याही रणनीतीची गरज नसल्याचा विश्वास नीतीश कुमार यांना आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


प्रशांत किशोर यांची हकालपट्टी झाल्यानंतर भाजप आणि जेडीयूमधील संबंध अधिक घट्ट झाले आहेत.


बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिल्लीमध्ये भाजप नेत्यांसोबत प्रचार करणार आहेत. पहिली रॅली ते गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत करणार आहेत.


२ फेब्रुवारीला दोन्ही रॅली होणार आहेत. बिहारच्या बाहेर अमित शाह आणि नितीश यांची पहिली निवडणूक प्रचार सभा होणार आहे.