इंजीनिअर प्रवीण निषाद यांनी उडवली योगींची झोप, २९ वर्षानंतर रचला इतिहास
उत्तर प्रदेशमधील २ लोकसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपला चांगलाच धक्का बसला आहे.
लखनऊ : उत्तर प्रदेशमधील २ लोकसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपला चांगलाच धक्का बसला आहे.
गोरखपूरमधून सपा पुरस्कृत उमेदवार प्रवीण निषाद पुढे आहेत. या दोन्ही जागांवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. गोरखपूर हा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मतदारसंघ आहे. फुलपूर हा उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांचा मतदारसंघ आहे.
गोरखपूरमधून सपाचे प्रवीण निषाद हे भाजप उमेदवाराच्या पुढे आहेत.
कोण आहेत प्रवीण कुमार निषाद
निषाद पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. संजय निषाद यांचे पुत्र आहेत. प्रवीण कुमार निषाद यांनी 2009 मध्ये एनआयआयटी ग्रेटर नोएडामधून बीटेक (मॅकेनिकल) केलं. इंडो एलोसिस इंडस्ट्रीज लिमिटेड म्हणून राजस्थानमध्ये त्यांनी ३ वर्ष मॅनेजर म्हणून नोकरी केली. त्यानंतर सिक्किम मनीपाल यूनिवर्सिटीमधून त्यांनी एमबीए केलं.
डॉ. संजय निषाद यांनी ऑगस्ट २०१६ मध्ये जेव्हा निषाद पक्षाची स्थापना केली तेव्हा पक्षाचे प्रदेश प्रभारी म्हणून प्रवीण कुमार निषाद यांनी काम केलं.