दंतेवाडा : सध्या संपूर्ण जग पुन्हा एकदा कोरोना विषाणूच्या भयावह परिस्थितात आहे. भारतातही या विषाणूने पुन्हा एकदा आपले रौद्र रुप घेतले आहे. मुख्य म्हाणजे या कोरोनाची दुसरी लाट खुपच भयानक आहे. हा विषाणू पहिल्यापेक्षा आधिक भयानक आणि जलद गतीने वाढत आहे. त्यामुळे दररोज लाखो नवीन रुग्णांची संख्या समोर येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या परिस्थितीमुळे  कोरोनाला रोखण्यासाठी पुन्हा एकदा सर्वत्र नियम कठोर केले आहेत. तर काही शहरात आणि राज्यात लॅाकडाऊन देखील लावला गेला आहे. त्याचबरोबर मास्क घालने आणि सामाजिक अंतर ठेवणे तसेच इतर अनेक गोष्टींकडे संपूर्ण लक्ष दिले जात आहे.


या विषयावर सोशल मीडियावरही लोक बरेच मजेदार फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आहेत. तसेच काही लोकं मीम्सच्या माध्यमातून परिस्थिती सांगत आहेत. अशातच सोशल मीडियावर एक व्हीडीओ खूप व्हायरल होत आहे. यामध्ये एक महिला डीएसपी आहे. जी प्रेग्नेनट आहे तरीही ती आपले कर्तव्य बजावत आहे.


कोरोना विषाणूमुऴे रस्त्यावर पुन्हा एकदा पोलिसांकडून कडकपणा वाढवला गेला आहे. प्रत्येक ठिकाणी नाकाबंदी आहे. अशा परिस्थितीत छत्तीसगडमधील दंतेवाड्यात तैनात असलेल्या डीएसपी शिल्पा साहूचा हा व्हिडीओ आहे. जो पाहूण लोकं तिच्या या कार्याचे कौतुक करत आहेत. डीएसपी शिल्पा साहू प्रेग्नेनट आहे, तरीही आपले कर्तव्य बजावत आहे.


आपण व्हिडीओमध्ये पाहू शकता की, तिची काय परिस्थिती आहे ते? तरीही ती हातात काठी घेऊन रस्त्यावर उतरली आहे आणि लोकांना कोरोनाचे नियम पाळण्याचे संदेश देत आहेत. तसेच ती विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांची चौकशी करत आहे.



हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लोकं हा व्हिडीओ माठ्या प्रमाणावर शेअर करत आहेत आणि महिला डीएसपीच्या या कार्याला सलाम देखील करत आहेत. लोकं कशा प्रकारे तिला रिएक्शन देत आहेत ते आपण पाहूयात.