विरुधुनगर : तमिळनाडुच्या विरुधुनगरमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गर्भवती महिलेला एचआयव्ही संक्रमित रक्त चढवल्याने या गर्भवती महिलेला एचआयव्हीची लागण झाली आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. सरकारी रुग्णालयातील या धक्कादायक प्रकारानंतर २ कमर्चाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. तमिळनाडु सरकारने या प्रकरणात राज्यातील सगळ्या ब्लड बँकांना रक्ताची चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. आरोग्य विभागाने या सरकारी रुग्णालयाच्या संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिलेला जेव्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा डॉक्टरांनी महिलेला हिमोग्लोबिन कमी असल्य़ाने रक्त चढवण्याचा सल्ला दिला. महिलेला एका ब्लड बँकेमधून आणलेलं रक्त चढवण्यात आलं. पण रक्तदात्याला एचआयव्हीची लागण असल्याचं समोर आलं. त्यानंतर महिलेच्या रक्ताची देखील चाचणी करण्यात आली. ज्यामध्ये महिलेला देखील एचआयव्हीची लागण झाल्याचं समोर आलं. राज्य सरकारने या महिलेवर आवश्यक त्या सगळे उपचार करण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर आता ब्लड बँकेतील सगळ्या रक्ताची चाचणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


ब्लड बँकेच्या कर्मचाऱ्यांनी खासगी रुग्णालयाला रक्त देतांना त्याची योग्य प्रकारे चाचणी न केल्याचं समोर आलं आहे. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी देखील खेद व्यक्त केला आहे. सरकार या महिलेवर एचआयव्हीचा परिणाम होऊ नये म्हणून हवे ते पाऊल उचलत आहे. असं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. महिलेच्या पतीने यासाठी राज्य सरकारला दोषी ठरवलं आहे. महिलेच्या पतीने म्हटलं की, 'मला कोणतीही मदत किंवा सरकारी नोकरी नको आहे. माझ्या पत्नीला योग्य तो उपचार देण्यात यावा.'