मुंबई : इगतपुरी रेल्वे स्थानकात महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. मुंबई-वाराणसी विशेष ट्रेनने प्रवासस करत असलेल्या एका गर्भवती महिलेने इगतपुरी रेल्वे स्थानकात बाळाला जन्म दिला. मध्य रेल्वे-मुंबई विभागीय टीमच्या मदतीमुळे या महिलेची प्रसुती सुखरुप पार पडली. सध्या बाळाला आणि आईला उपचारासाठी इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बाळ आणि आई दोघांची  प्रकृती उत्तम असल्याचं सांगण्यात येत आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रवासादरम्यान या महिलेला प्रसुती वेदना सुरू झाल्या. तेव्हा क्षणाचाही विलंब न करता इगतपुरी रेल्वेचे व्यवस्थापक अवधेश कुमार यांनी आरोग्य विभागाला याबाब कळवले. त्यानंतर तात्काळ सहाय्यक विभागीय वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योत्सना यांच्या मदतीने महिलेची प्रसुती करण्यात आली. 
 
दरम्यान, देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. देशातील रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रेल्वे फेऱ्या बंद करण्याचा निर्णय घेतला होता. आता मात्र लांब पल्ल्याच्या गाड्या धावत असून फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरू करण्यात आल्या आहेत.