उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील आग्रा येथे पतीसोबत माहेरी जाणाऱ्या आठ महिन्यांच्या गरोदर महिलेला डंपरने धडक दिल्याची दुदैवी घटना घडली. ही घटना इतकी भीषण होते की या घटनेत आई आणि बाळ वाचेल याची शक्यता देखील नव्हती. मात्र झालं असं की कुटूंबासमोर आनंद साजरा करावा की दु:ख असा प्रश्न समोर ठाकला. या घटनेने संपुर्ण उत्तरप्रदेश हळहळलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पतीसोबत माहेरी जाणाऱ्या आठ महिन्यांच्या गरोदर महिलेला बायपास रोडवर विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुसऱ्या मोटारसायकलने धडक दिली. या धडकेत दुचाकीचे संतुलन बिघडल्याने रामकुमार आणि कामिनी उडी मारून रस्त्यावर पडले. या दरम्यान रस्त्यावरून धावणाऱ्या एका डंपरने महिलेला चिरडले. या अपघातात २४ वर्षीय महिला कामिनीचा मृत्यू झाला. 


नवजात बाळाचं काय झाल? 
भरधाव डंपरने कामिनीच्या शरीराच्या वरच्या भागाला चिरडल्याने खालच्या भागावर दबाव आला आणि मधल्या रस्त्यावरच बाळाचा जन्म झाला. या घटनेतील सर्वात वेदनादायक बाब म्हणजे कामिनीने एका मुलीला जन्म दिला, पण मुलीचा चेहरा न पाहता तिने जगाचा निरोप घेतला. जेव्हा लोकांनी हा अपघात रस्त्यात पाहिला तेव्हा ते हादरले, कारण आईचा मृत्यू झाला होता. त्याचवेळी शेजारी नवजात मुलगी रडत होती.


रूग्णालयात केले दाखल
कामिनीचा नवराही रस्त्यावर जखमी अवस्थेत पडला होता. लोकांनी तात्काळ कामिनीच्या नवजात मुलीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. जेथे तिची प्रकृती धोक्याबाहेर आहे. कामिनीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. नवजात मुलीवर उपचार करणारे वैद्यकीय महाविद्यालयाचे ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉक्टर एल के गुप्ता यांनी सांगितले की, सध्या मुलगी धोक्याबाहेर आहे. त्यांना एनआयसीयू वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे.


दरम्यान या घटनेत पोलिसांनी डंपर ताब्यात घेतला असून डंपर सोडून पळून गेलेल्या चालकाचा शोध सुरू आहे.