Budget 2020 : वीज घेण्यासाठी प्रीपेड सेवा, नवे वीज मीटर १ एप्रिलपासून
आता इलेक्ट्रिक वीज मीटर बंधनकारक असणार आहे.
नवी दिल्ली : वीजचोरीला आळा घालण्यासाठी आता इलेक्ट्रिक वीज मीटर बंधनकारक असणार आहे. नवे वीज मीटर हे १ एप्रिलपासून बसविण्यात येणार आहेत. देशभरात १ एप्रिलपासून प्रत्येक घरात वीजेचे प्रीपेड मीटर लावणे बंधनकारक करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना दिली. केंद्र सरकारने यासाठी २०२२पर्यंत याचे टार्गेट ठेवले आहे. त्यामुळे आता वीज घेण्यासाठी आधी पैसे भरावे लागणार आहे. म्हणजेच वीज हवी असल्यास रिचार्ज करावे लागणार आहे. जर रिचार्ज केले नाही तर घरात विद्युत पुरवठा होणार नाही. मोबाइल फोनप्रमाणे आता वीजेसाठी रिचार्ज करावे लागणार आहे.
आता प्रत्येक घरात इलेक्ट्रिक मीटर लावणे गरजेचे आहे. येत्या दोन वर्षांत घरातील सर्व मीटर प्री पेड करण्यात येणार आहेत. टप्प्याटप्प्याने जुने मीटर हटवण्यात येणार आहेत. स्मार्ट मीटरमधून वीज सप्लाय करण्यात येणार आहे. दरम्यान, नव्या वीज मीटरमधून तुम्हाला दर निवडण्याचा पर्याय असणार आहे. यासाठी २२ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली.
प्रत्येक घरात वीज मीटर लावण्यासाठी २०२२पर्यंत याचे टार्गेट आहे. त्यासाठी स्मार्ट प्रीपेड मीटरचे उत्पादन वाढवण्याची सूचना देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. येत्या काही दिवसांत याची मागणी वाढणार असल्याने याआधीच प्रीपेड मीटर बनवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, प्रीपेड वीज मीटर आल्यास ग्राहकांना वीज मीटरचे बील पाठवणे बंद होणार आहे.
वीज कंपन्यांचा यावर होणारा खर्च कमी होणार आहे. मात्र, या नव्या धोरणामुळे वीज क्षेत्रात क्रांती घडणार आहे. असे असले तरी बाजारात प्रीपेड वीज मीटर आले उपलब्ध असले तरी सर्वसाधारण वीज मीटरसाठी ८ हजार रुपये मोजावे लागणार आहेत. एकद उच्च दर्जाच्या वीज मीटरची किंमत २५ हजार रुपयांच्या घरात आहे. नव्या वीज मीटरचे रिचार्ज मोबाइलवरून करु शकता.