हरियाणातील ३६व्या अग्रोहा संमेलनाची जोरदार तयारी
येत्या ऑक्टोबरमध्ये हरियाणात होऊ घातलेल्या ३६व्या अग्रोहा संमेलनाची जोरदार तयारी सुरु झाली आहे.
चंदीगड : येत्या ऑक्टोबरमध्ये हरियाणात होऊ घातलेल्या ३६व्या अग्रोहा संमेलनाची जोरदार तयारी सुरु झाली आहे. रविवारी यासंदर्भात तयारीची बैठक खासदार आणि एस्सेल समूहाचे अध्यक्ष डॉ. सुभाष चंद्रा यांच्या अध्यक्षतेखाली लखनऊमध्ये पार पडली.
यावेळी वैश्य समाजाचे अनेक महत्वाचे नेते,मंत्री,खासदार उपस्थित होते. अग्रोहा संमेलन केवळ अग्रवाल समाजाचे नव्हे तर संपूर्ण वैश्य समाजाचे संमेलन आहे, असे प्रतिपादन यावेळी डॉ. सुभाष चंद्रा यांनी केले. लखनऊच्या सायंटिफिक कॉन्वेंशन सेंटरमध्ये हा बैठक झाली.
यावेळी उत्तरप्रदेशचे मंत्री नंद गोपाळ नंदी व्यासपीठावर होते. येत्या पाच ऑक्टोबरला महाराजा श्रीअग्रेसनांची भूमी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या हरियाणाच्या हिस्सारमधील अग्रोहाधाम मध्ये हे संमेलन होणार आहे. या संमेलनामागे कोणताही राजकीय हेतू नसल्याचंही यावेळी डॉ. सुभाष चंद्रा यांनी आवर्जून स्पष्ट केले.