श्रीनगर: दिल्लीच्या लाल किल्ल्यापासून श्रीनगरच्या लाल चौकापर्यंत देशात स्वातंत्र्य दिनाची तयारी सुरु आहे. अनुच्छेद 370 हटवल्यानंतर आज देश खऱ्या अर्थाने एक झाला अशी अनेकांची भावना आहे. जम्मू-काश्मीरमध्ये 15 ऑगस्टच्या निमित्ताने पहिल्यांदाच स्वातंत्र्य दिनाच्या सेलिब्रेशनची तयारी सुरु आहे. जम्मू-काश्मीरमध्ये परेडचा सराव सुरु आहे. विविध सांस्कृतिक कार्यक्रम देखील होणार आहेत. प्रशासनाने यासाठी खास तयारी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देशभरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गेल्या 24 तासात कोणतीही मोठी घटना घडलेली नाही. पण देशात हायअलर्ट आहे. अधिकारी आणि जवान प्रत्येक घडामोडींवर बारीक नजर ठेवून आहेत.


जम्मू-काश्मीरमधील रुग्णालयांमध्ये औषधांचा पुरवठा झाला आहे. महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. सार्वजनिक ठिकाणी विशेष काळजी घेतली जात आहे. पाकिस्तानकडून काही नापाक हरकती होऊ शकतात त्यामुळे काही ठिकाणी काही गोष्टींवर बंदी आहे.  काश्मीर खोऱ्यात सध्या चोख सुरक्षा व्यवस्था आहे.