नवी दिल्ली : ११ मे १९९८ रोजी राजस्थानच्या पोखरणमध्ये तीन अणुबॉम्बच्या यशस्वी चाचण्या करत भारत 'न्यूक्लिअर' देश बनला. हा देशासाठी एक अभिमानाचा क्षण होता. यावेळी पंतप्रधान होते अटल बिहारी वाजपेयी... त्यांच्याच कणखर नेतृत्वाखाली संरक्षण संशोधन व विकास संस्था प्रमुख एपीजे अब्दुल कलाम आणि अणुऊर्जा विभागाचे प्रमुख आर. चिदंबर यांनी हा धोका पत्करला आणि तो यशस्वीही करून दाखवला. यानंतर 'मिसाईलमॅन' २५ जुलै २००२ रोजी कलाम यांनी भारताच्या राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली... यामागे वाजपेयी यांचा महत्त्वाचा वाटा होता... भारताचे दिवंगत राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी आपण राष्ट्रपती कसे झालो, याचा एक किस्सा सांगितला होता, तो एपीजे यांच्याच शब्दांत... 


शिक्षक ते राष्ट्रपती


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१० जून २०१२ रोजीची सकाळ होती. अन्ना विद्यापीठातील खूप सुंदर वातावरण होते. या ठिकाणी मी विद्यापीठात २००१ पासून काम करत होतो. मी या विद्यापीठात बराच काळ आनंदात आणि मजेत घालवत होते. येथील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांसोबत त्यांना शिकवत खूप चांगले सुरू होते. 


माझ्या क्लासमध्ये अधिकृत ६० विद्यार्थ्यांची क्षमता होती पण माझ्या प्रत्येक लेक्चरमध्ये साधारण ३५० विद्यार्थी बसत होते. क्लासमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना नियंत्रित करण्याचा कोणताही मार्ग नव्हता. त्या दिवशी लेक्चर झाल्यावर मी माझ्या ऑफिसमध्ये जात होतो. मी दुपारचे जेवण घेतले आणि संध्याकाळच्या लेक्चरच्या तयारीसाठी रूमवर जात होतो. 


मी जात असताना अण्णा विद्यापीठाचा कुलगुरू प्रो. ए. कलानिधी भेटले. त्यांनी सांगितले की, तुमच्या ऑफीसमध्ये अनेक फोन येऊन गेलेत. कोणाला तरी खूप महत्त्वाचं बोलायचं होतं. 


Caption

पंतप्रधान वाजपेयींचा फोन 


मी माझ्या रूमवर पोहचलो तेव्हा फोनची रिंग वाजत होती. मी फोन उचलला, तिकडच्या आवाजाने सांगितले की, पंतप्रधानांना तुमच्याशी बोलायचं आहे. 


पंतप्रधानांना माझा फोन जोडून दिला जात होता त्यावेळेत मला त्यावेळेचे आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा मोबाईल फोनवर फोन आला. त्यांनी सांगितले, की पंतप्रधान खूप महत्त्वाच्या कामासाठी तुम्हांला फोन करत आहेत. तुम्ही 'नाही' म्हणून नका...


निर्णयाचा क्षण


तेवढ्यात पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा फोन आला.. त्यांनी विचारले, तुमचे शिक्षकी जीवन कसं सुरू आहे? 


खूप छान... मी उत्तर दिलं. वाजपेयी बोलू लागले. 'एक महत्त्वाची बातमी आहे तुमच्यासाठी... मी आताच एनडीएच्या घटक पक्षांची बैठक आटपून आलो आहे. आम्ही एकमताने ठरवलं की देशाला तु्म्ही राष्ट्रपती म्हणून हवे आहात... मी याची घोषणा आज रात्री करणार आहे. मला याची तुम्हाला माहिती द्यायची आहे. मी फक्त 'हो' ची अपेक्षा करतो आहे 'नाही'ची नाही... मी एनडीएच्या २४ पक्षांच्या नेत्यांशी बोललो आहे. इतक्या पक्षांचे एकमत होणे खूप कठीण आहे, असे अटलजींनी सांगितले होते. 


इतक सारं घडलं की मी रूममध्ये आल्यावर मला बसायलाही वेळ मिळाला नाही. स्वतःची भविष्यातील एक वेगळी प्रतिमा मला दिसत होती. मला नेहमी प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचा गराडा असतो. आता काय होईल असे गणित माझ्या डोक्यात सुरू होते. मी म्हणालो, वाजपेयीजी, (मी नेहमी त्यांना याच नावाने हाक मारायचो) मला तुम्ही दोन तास देऊ शकतात का. मला निर्णय घेण्यासाठी दोन तास हवे आहेत. तसेच सर्व पक्षांचे माझ्या उमेदवारीवर एकमत असायला हवे असेही मला वाटते. 


वाजपेयी म्हणाले, तुम्ही हो म्हणा, आम्ही एकमत होण्यासाठी काम करू... 


कलामांनी दोन तासांचा वेळ मागितला


त्यानंतर पुढील दोन तास जवळच्या मित्रांचे तीसच्या वर फोन आलेत. यात सिव्हिल सर्व्हिस, अॅकेडमीक आणि राजकारणी मित्रांचा समावेश होता. यावेळी माझे एक मन म्हणत होते. मी माझी अॅकेडमिक लाइफ इन्जॉय करतो आहे. ते माझे पॅशन आणि प्रेम आहे. मला ते डिस्टर्ब करायचं नव्हतं. आणि दुसरं मन म्हणत होतं की इंडिया व्हिजन २०२० हे देशासमोर आणि संसदेसमोर मांडता येईल. त्यामुळे मी त्याचा विचार करून यात उडी घेतली. 


दोन तासांनतर पुन्हा पंतप्रधान वाजपेयी यांचा फोन आला. मी म्हणालो, वाजपेयीजी, मला हे खूप महत्त्वाचे मिशन वाटते आहे. मी सर्व पक्षांचा उमेदवार असलो पाहिजे असे मला वाटते. 


ते म्हणाले, हो आपण यावर काम करू, धन्यवाद....


ही बातमी वाऱ्यासारखी पसरली १५ मिनिटात मी राष्ट्रपतीपदाचा उमेदवार असल्याचे सर्व देशाला माहीत झाले. त्यानंतर माझ्यावर अनपेक्षित फोनचा भडीमार झाला. माझी सुरक्षा वाढविण्यात आली. मला भेटणाऱ्यांची रांग लागली. 


सोनियांनी दिला पाठिंबा...


एक दिवशी वाजपेयीजींनी सोनिया गांधींशी चर्चा केली. त्यावेळी सोनिया गांधीनी विचारले की एनडीएने उमेदवार निश्चित केला आहे? त्यावेळी वाजपेयीजींनी होकार दिला. त्यानंतर त्यांनी घटक पक्षांची चर्चा करून माझ्या नावाला पसंती दिली. तो दिवस होता १७ जून २००२...


मला डाव्या पक्षांचा पाठिंबा मिळाला असता तर मला खूप आनंद झाला असता, पण त्यांनी त्यांचा उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला. मी उमेदवार होण्याचे स्वीकारले. त्यानंतर माझ्याबद्दल विविध वर्तमानपत्रात लिहून आले. मीडियामध्ये अनेक तर्क वितर्क लढविण्यात आले. अनेकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. राजकारणातील बाहेरचा व्यक्ती एक शास्त्रज्ञ कसा राष्ट्रपती होऊ शकतो असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. 


वाजपेयी आणि कलाम

रामजन्मभूमीवर कलामांचे उत्तर


१८ जून रोजी माझी पहिली पत्रकार परिषद होती. त्यावळी मला गुजरात दंगल, राम जन्मभूमी, अणू चाचणी आणि राष्ट्रपती भवनातील प्लॅन संदर्भात अनेक प्रश्न विचारण्यात आले. मी सांगितले, भारताला साक्षर आणि सुशिक्षित राजकीय वर्ग हवा. तो विचारिक निर्णय घेऊ शकतो. अयोध्या प्रश्नात शिक्षण, आर्थिक विकास आणि मनुष्याबद्दल आदर दाखविल्यास सुटू शकतो. 


१८ जुलै २००२ रोजी चांगल्या मतांनी मी विजयी झालो. त्यानंतर २५ जुलै रोजी एका शानदार समारंभात मी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली. असा झालो मी राष्ट्रपती...