मुंबई : देशाच्या 15 व्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी 18 जुलै म्हणजेच सोमवारी मतदान होणार आहे. सुमारे 4800 खासदार आणि आमदार मतदान करणार आहेत. या निवडणुकीत एनडीएकडून उमेदवार द्रौपदी मुर्मू असणार आहेत, तर दुसरीकडे विरोधकांकडून संयुक्त उमेदवार यशवंत सिन्हा आहेत. राजकीय पक्षांच्या पाठिंब्याचे गणित आणि त्यातून निर्माण होणारे आकडे यावर बोलायचे झाले तर एनडीएच्या उमेदवाराचा विजय जवळपास निश्चित आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2022 च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांच्या समर्थनार्थ 60 टक्क्यांहून अधिक मतांची अपेक्षा आहे. 18 जुलै रोजी राष्ट्रपती निवडणूक 2022 साठी मतदान झाल्यानंतर, 21 जुलै रोजी मतमोजणी होईल आणि नवनिर्वाचित राष्ट्रपती 25 जुलै रोजी शपथ घेतील.


एनडीएच्या उमेदवाराला या पक्षांचा पाठिंबा


NDA उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना बिजू जनता दल, वायएसआर काँग्रेस, बहुजन समाज पार्टी (बीएसपी), ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम (एआयएडीएमके), जेडीएस, तेलगू देसम पार्टी (टीडीपी), शिरोमणी अकाली दल यांचा पाठिंबा आहे. सोबतच शिवसेना आणि झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) सारख्या प्रादेशिक पक्षांचाही त्यांना पाठिंबा आहे. एनडीएच्या उमेदवाराला आतापर्यंत एकूण 10,86,431 मतांपैकी 6.67 लाख मते मिळाली आहेत.


प्रत्येक राज्यातील आमदाराच्या मताचे मूल्य वेगळे असते.


राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत वेगवेगळ्या राज्यांच्या आमदारांच्या मताचे मूल्य वेगळे असते. उत्तर प्रदेशच्या 403 आमदारांपैकी प्रत्येकाच्या मताचे मूल्य 208 आहे, म्हणजेच त्यांचे एकूण मूल्य 83,824 आहे. तामिळनाडू आणि झारखंडच्या प्रत्येक आमदाराच्या मताचे मूल्य 176 आहे. महाराष्ट्रात प्रत्येक आमदाराच्या मतांचे मूल्य 159, बिहारमध्ये 173 आणि आंध्र प्रदेशात 159 आहे.


या राज्यांमध्ये मतांचे मूल्य कमी आहे


लहान राज्यांमध्ये, सिक्कीमच्या प्रत्येक आमदाराचे मत मूल्य 7 आहे. मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश प्रत्येकी आठ, नागालँड 9, मेघालय 17, मणिपूर 18 आणि गोवा 20 आहे.


निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार राष्ट्रपती निवडणुकीतील मतदानादरम्यान खासदार आणि आमदारांना वेगवेगळ्या रंगाच्या मतपत्रिका देण्यात येणार आहेत. जिथे खासदारांना हिरवे तर आमदारांना गुलाबी रंगाचे मतपत्रिका मिळेल. रिटर्निंग अधिकाऱ्यांना मतमोजणी करणे सोपे व्हावे यासाठी असे केले जाईल.