मुंबई : देशातील 15 व्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सोमवारी मतदान झाले. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत यूपी, गुजरात, ओडिशा ते आसामपर्यंत क्रॉस व्होटिंगही पाहायला मिळाले. दुसरीकडे, गुजरातमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि ओडिशा-आसाममध्ये काँग्रेस आमदारांनी क्रॉस व्होटिंगचा दावा केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुजरातमध्येही क्रॉस व्होटिंग


गुजरातमध्ये शरद पवार यांच्या पक्षाचे राष्ट्रवादीचे आमदार कांधल एस जडेजा यांनी सांगितले की त्यांनी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मतदान केले. तर ओडिशामध्ये ही काँग्रेस आमदाराने एनडीए उमेदवाराला मतदान केल्याचं म्हटलं आहे.


ओडिशाचे काँग्रेस आमदार मोहम्मद मुकीम म्हणाले, ते काँग्रेसचे आमदार आहेत. मात्र त्यांनी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मतदान केले. हा माझा वैयक्तिक निर्णय आहे, मी माझ्या आतला आवाज ऐकला, ज्याने मला माझ्या मातीसाठी काहीतरी करायला सांगितले. म्हणूनच मी द्रौपदी मुर्मू यांना मत दिले. ओडिशात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष न केल्याने मुकीम नाराज असल्याचे बोलले जात आहे.