नवी दिल्ली : देशातला सर्वोच्च नागरी सन्मान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारा प्रदान सोहळा राष्ट्रपती भवनात पार पडला. विविध क्षेत्रात अतुलनीय कामगिरी बजावणा-यांचा पद्म पुरस्कारानं सन्मान करण्यात आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदा तीन जणांना पद्मविभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलंय. तर नऊ जणांना पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलंय. महाराष्ट्रातून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अभय बंग आणि राणी बंग यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं. यंदा ७३ जणांचा पद्मश्री पुरस्कारानं सन्मान करण्यात आलाय. 



तर क्रीडा क्षेत्रातील अुतलनिय कामगिरीसाठी टेनिसस्टार सोमदेव देवबर्मन आणि बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांतचा पद्मश्री पुरस्कारानं गौरव करण्यात आला. राष्ट्रपतीभवनात झालेल्या शानदार सोहळ्यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 


टेनिसमध्ये सोमदेवनं तर श्रीकांतनं बॅडमिंटनमध्ये भारताचा तिरंगा आंतरराष्ट्रीय स्तरावर डौलानं फडकवलाय. आणि त्यामुळेच त्यांचा पद्मश्रीनं सन्मान करण्यात आला.