नवी दिल्ली : राम मंदिर भूमीपूजन..आज अखेर तो दिवस आला आणि या ऐतिहासिक क्षणासाठी अयोध्यानगरी सज्ज झाली. या भव्य दिव्य अशा कार्यक्रमामध्ये अनेक नेतेमंडळी संतमहंत याठिकाणी उपस्थित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंत्रोच्चाराच्या गजरात राम मंदिर उभारणीचा भूमिपूजन सोहळा थाटात पार पडला. यावेळी पंतप्रधानांसह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि सरसंघचालक मोहन भागवत हे देखील उपस्थित होते.


 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, 'राम मंदिर उभारणीच्या सर्वांना शुभेच्छा... प्रभू राम यांच्या मंदिर उभारणीचं कार्य सर्व प्रकारच्या न्यायप्रक्रिया, सार्वजनिक आणि सामाजिक समरसतेच्या दृष्टीने होत असल्याचं ते म्हणाले. 
 
शिवाय राम मंदिर रामराज्यावर आधारलेल्या आधुनिक भारताचं प्रतिक असेल, असा विश्वास देखील त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला. दरम्यान या सोहळ्यादरम्यान सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. तसंच या परिसरात जाण्यासाठी निमंत्रण पत्रिकांवर हाय सिक्युरिटी कोड देण्यात आला आहे. 


या द्वारेच संबंधित व्यक्तीला भूमिपूजनाच्या ठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे. यामध्ये १३५ संत-महंतांचा समावेश आहे. कोरोना व्हायरच्या पार्श्वभूमीवर ही सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.