राष्ट्रपती कोविंद आज नागपूर दौऱ्यावर
भारताचे राष्ट्रपती महामहिम रामनाथ कोविंद आज एकदिवसांच्या नागपूर दौऱ्यावर येणार आहेत.
नवी दिल्ली : भारताचे राष्ट्रपती महामहिम रामनाथ कोविंद आज एकदिवसांच्या नागपूर दौऱ्यावर येणार आहेत.
या दरम्यान राष्ट्रपती विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. यात कामठी येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या विपश्यना केंद्राचं उदघाटन आणि नागपुरातील महापालिकेच्या सुरेश भट सभागृहाचा लोकार्पण समारोह प्रमुख राहणार आहे.
राष्ट्रपतींच्या दौऱ्यानिमित्त प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. सुरेश भट सभागृहाच्या लोकार्पण आणि विपश्यना केंद्राच्या उदघाटन प्रसंगी राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही उपस्थित राहणार आहेत.