नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सकाळी १० वाजता दिल्लीतल्या संसदेच्या इमारतीत खोली क्रमांक ६२ मध्ये तर देशातल्या सगळ्या विधानसभाच्या इमारतीत ही मतदान प्रक्रिया सुरु झाली. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे.


राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीत एनडीएच्यावतीनं रामनाथ कोविंद तर यूपीएच्या वतीने मीरा कुमार मैदानात उतरल्या आहेत. एनडीएच्या बाजूनं एकूण मतदानापैकी ७०% मतदान आहे. त्यामुळे कोविंद यांचा विजय निश्चित आहे. तरीही यूपीएच्या उमेदवार मीराकुमार यांनी संपूर्ण ताकदीनिशी लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. सकाळपासूनच मतदानासाठी खासदारांनी रांगा लावल्या आहेत. इकडे महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, आंध्रप्रदेश सगळीकडे त्या त्या राज्यातल्या आमदारांनी मतदानाला सुरुवात केली आहे.