नवी दिल्ली : Presidential Election : राष्ट्रपती निवडणुकीसाठी आता काँग्रेसने (Congress) हालचाली सुरू केल्या आहेत. मतभेद विसरून एकत्र या असं आवाहन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी विरोधी पक्षांना केले आहे. राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भात सोनियांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि इतर विरोधी नेत्यांसी त्यांनी संपर्क साधला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेसने अजून राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवाराचं नाव दिलेले नाही. राष्ट्रहितासाठी आपण मतभेद विसरुन एकत्र आले पाहिजेत, असे सोनिया गांधी यांनी म्हटले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी 15 जून रोजी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबतच्या संयुक्त बैठकीत सहभागी होणार आहेत.


यासाठी ममता यांनी 22 नेत्यांना पत्रही लिहिले आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी 18 जुलैला मतदान होणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही ममता बॅनर्जी यांनी पत्र लिहिले आहे.