राष्ट्रपतीपदासाठी कोण कोण भरणार अर्ज?
राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीसाठी आजपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होतेय.
नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीसाठी आजपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होतेय.
येत्या १७ जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. आज याच निमित्ताने आज विरोधी पक्षांच्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार आहे.
काँग्रेस नेते गुलामनबी आझाद यांनी ही बैठक बोलावली असून संसद भवनाच्या परिसरात विरोधी पक्षाचे दिग्गज नेते उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. तर तिकडे मोदी सरकारच्या वतीनं तीन मंत्र्यांचा गट सर्वपक्षीयांशी चर्चा करणार आहे.
राष्ट्रपतींची निवड एकमतानं व्हावी अशी सरकारची इच्छा असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी काल एका पत्रकार परिषदेत म्हटलंय.