मुंबई : आजपासून काही बदल होत आहेत. परंतु या बदलांच्या दरम्यान, सर्वात मोठा झटका हा स्वयंपाकघरातील खर्चाला बसला आहे. महिन्याच्या पहिल्या दिवशी सर्वसामान्यांच्या खिशात हात घालण्यात आला आहे. देशातील तेल विपणन कंपन्यांनी (एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसी) एलपीजी एलपीजी सिलिंडर (एलपीजी गॅस सिलिंडर) च्या अनुदानात वाढ केली आहे. दिल्लीत १४.२ किलो विना अनुदानित एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत एक रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आता नवीन दर ५९४ रुपयांवर पोहोचले आहेत. दरम्यान, सातत्याने पेट्रोल-डिझेलमध्ये वाढ होत आहे.


इतर राज्यातही बदल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या २२ दिवसांपासून तेल विपणन कंपन्या केवळ पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवत होत्या. आता महागाई स्वयंपाकघरात पोहोचण्याची ही पहिलीच वेळ आहे. आमच्या सहयोगी zeebiz.com च्या मते, इतर शहरांमध्येही आजपासून देशांतर्गत एलपीजी सिलिंडरच्या किंमती वाढविण्यात आल्या आहेत. कोलकातामध्ये ४ रुपये, मुंबईत ३.५० आणि चेन्नईत ४ रुपये महाग झाले आहेत. मात्र, १९ किलो सिलिंडरच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे.


जूनमध्येही किंमत वाढ 


जूनमध्ये दिल्लीत १४.२ किलो विना अनुदानित एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत ११.५० रुपयांनी वाढ झाली. त्याच वेळी मे महिन्यामध्ये ते १६२.५० रुपयांनी स्वस्त झाले.


काय आहेत नवीन दर ?


IOC वेबसाइटवर दिलेल्या किंमतीनुसार दिल्लीतील सिलिंडरच्या किंमतीत एक रुपयांची वाढ झाली आहे. दिल्लीत आता १४.२ किलो विना अनुदानित एलपीजी सिलिंडरची किंमत ५९३ रुपयांवरून ५९४ रुपयांवर गेली आहे.