मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये ६ दिवसांपासून चालू झालेली घसरण अखेर बुधवारी थांबली. राष्ट्रीय राजधानी दिल्लीसोबत देशाच्या वेगवेगळ्या मेट्रो शहरांमध्ये तेलाच्या किंमतीमध्ये कोणताही बदल झाला नाही. दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय बाजारात देखील कच्च्या तेलाची किंमतीही कमी झाल्या आहेत. बाजारातील विश्लेषकांचे म्हणणे आहे की, अमेरिकेतील तेल साठ्यांमध्ये होणाऱ्या वाढीच्या अहवालामुळे, कच्च्या तेलाचे भाव स्थिर झाले आहेत, परंतु तेलाच्या किमतींमध्ये वाढ होण्याची शक्यता अजूनही तरी संपलेली नाही.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार, बुधवारी दिल्लीत पेट्रोलचा भाव ७१.१८ रुपये, कोलकात्यात ७३.२५ रुपये, मुंबईत ७६.७९ रुपये आणि चैन्नईत ७३.८८ रूपये आहे. तर डिझेलचा भाव दिल्लीत पेट्रोलचा भाव ६५.८६ रुपये, कोलकात्यात ७३.२५ रुपये, मुंबईत ६९ रुपये आणि चैन्नईत ६९.६१ रुपये प्रति लीटर आहे. तर दिल्लीत मागील सहा दिवसापासून पेट्रोलचा भाव १ रूपया ८२ पैशांनी खाली आलाय, तर डिझेलही लीटरमागे ८० पैशांनी उतरलंय.


जरी कमोडिटी मार्केट विश्लेषकांच्या माहितीवर विश्वास ठेवला तर, तेल वितरण कंपन्यानी तेलाच्या भाव कमी करून, सर्वसामान्य जनतेला महागाईपासून दिलासा दिला आहे. पण पुढे दिलासा मिळण्याची संधी कमी आहे. कारण आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा बेंचमार्क गेल्या काही दिवसापासून ७० डॉलर प्रती बॅरलच्या वरच राहिला आहे.   


अमेरिकन पेट्रोलियम इंस्टीट्यूटच्या रिपोर्टनुसार, १० मेच्या शेवटच्या आठवड्यानुसार अमेरिकेच्या कच्च्या तेलाच्या भंडारात ८६ लाख बॅरलची वाढ झाली आहे. या रिपोर्टनंतर बुधवारी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलात येणारी वाढ थांबली, तरीसुध्दा कच्च्या तेलाचा भाव ७१ डॉलरने वाढला आहे.