अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक, `एम्स` पीएमओला देणार माहिती
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली भेट
मुंबई : 9 आठवड्यांपासून एम्स रूग्णालयात दाखल असलेल्या माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती बुधवारी आणखी बिघडली. एम्सकडून जाहीर होणाऱ्या हेल्थ बुलेटीनमध्ये सांगण्यात आलं की, गेल्या 24 तासांत त्यांची प्रकृती आणखी बिघडली आहे. आणि त्यांना लाइफ सपोर्ट सिस्टमवर ठेवण्यात आलं आहे. तसेच त्यांना युरिन इंफेक्शन झालं असून श्वास घेण्यास अडचणी निर्माण होत आहेत.
अटल बिहारी यांची तब्बेत बिघडल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, उप राष्ट्रपती वँकया नायडून आणि इतर केंद्रीय मंत्री, नेता त्यांची तब्बेत जाणून घेण्यासाठी एम्समध्ये पोहोचले. तसेच वाजपेयी यांचे समर्थक देखील मोठ्या संख्येने रूग्णालयात आहेत. मात्र हॉस्पिटलच्या बाहेर आणि आत सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
94 वर्षांच्या अटलबिहारी वाजपेयींना मूत्रमार्गामध्ये संसर्ग झाल्यामुळे एम्समध्ये दाखल करण्यात आलं. गेल्या काही वर्षांपासून वाजपेयी हे डिमेंशियानं आजारी आहेत. दोनच दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनीही एम्समध्ये जाऊन वाजपेयींची भेट घेतली होती.
वाजपेयी हे दिल्लीतील 6-ए कृष्णामेनन मार्गावर असलेल्या सरकारी घरात राहतात. त्यांना उठणे, बसणे तसेच बोलण्याकरता देखील त्रास होत होता. काही वेळ तर त्यांना लोकांना ओळखणे देखील कठीण झाले होते. त्यांच्या घरी एम्समधील डॉक्टरांची टीम तैनात होती.