PM Kisan Sanman | लाभार्थ्यांचा मृत्यू झाल्यास कोणाला मिळते रक्कम; जाणून घ्या सविस्तर
जर PM Kisan योजनेच्या लाभार्थीचा मृत्यू झाल्यास जाणून घ्या कोणाला मिळणार लाभ...
नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने देशातील लहान आणि सिमांत शेतकऱ्यांना आर्थिक स्वरूपात मदत देण्यासाठी पीएम किसान सम्मान निधीची सुरूवात 2019 मध्ये केली होती. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 2000 रुपयांचे तीन हफ्ते देण्यात येतात. यासाठी शेतकऱ्यांना पीएम किसान निधीच्या अधिकृत संकेतस्थळावर स्वतः नोंदणी करावी लागते. जर लाभार्थ्याचा मृत्यू झाल्यास संबधित हफ्ते कोणाला मिळतात. याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत.
किसान सन्मान निधीचा नियम
जर एखाद्या शेतकऱ्यांनी योजनेसाठी नोंदणी केली असल्यास त्याला वर्षातून तीन वेळा 2000 रुपयांची रक्कम मिळते.जर लाभार्थ्याचा मृत्यू झाल्यास तर कृषीयोग्य जमिनीची मालकी हक्क ठेवणाऱ्या शेतकऱ्याच्या वारसाला यो योजनेचा लाभ मिळतो.
वारसाला वेगळ्या पोर्टलच्या माध्यमातून नोंदणी करणे गरजेचे आहे. याशिवाय नोंदणी करताना वारस सर्व शर्थींची पूर्तता करीत आहे की नाही याची खातरजमा केली जाते. वारसाने या शर्थींची पूर्तता केल्यास या योजनेचा त्यांना नक्की लाभ मिळू शकतो. याविषयीची अधिक माहिती https://pmkisan.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आह.