नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM narendra modi) यांच्या आई हिराबेन मोदी (heeraben modi) यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हिराबेन मोदी यांना अहमदाबादमधील (Ahmedabad News) यूएन मेहता रुग्णालयात (UN Mehata Hospital, Ahmedabad) दाखल करण्यात आले आहे. हीराबा (Hiraba) यांना नियमित तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आल्याचे प्राथमिक माहिती मिळत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, हिराबा यांनी 18 जून रोजी वयाची 100 वर्षे पूर्ण केली. यापूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 आणि 12 मार्च रोजी गुजरातच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असताना 11 मार्च रोजी रात्री 9 वाजता आई हीराबा यांना भेटण्यासाठी ते गांधीनगरला पोहोचले होते,  जिथे त्यांनी आईचे आशीर्वाद घेतले होते. तेव्हा पीएम मोदींनी त्यांच्यासोबत खिचडी खाल्ली होती.  


तसेच गुजरात विधानसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान मोदींनी त्यांच्या गांधीनगर येथील निवासस्थानी त्यांच्या आईची भेट घेतली. त्यावेळी पीएम मोदी त्यांच्या आईशेजारी बसलेले दिसले. तसेच पंतप्रधान मोदींनीही तिच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेतले.


मीडिया‌ रिपोर्टनुसार, हीराबा यांच्यावर उपचार सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती देण्यात आली आहे. पंतप्रधान दुपारी अहमदाबाद येथे येण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत अद्यात अधिकृत सूत्रांकडून माहिती मिळालेली नाही. दुसरीकडे, असरवा विधानसभा मतदारसंघाचे आमदार दर्शनाबेन वाघेला या यूएन मेहता हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या आहेत. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे कॅबिनेटच्या बैठकीत आहे. बैठक समाप्त होताच ते देखील हॉस्पिटलमध्ये पोहोचणार आहे. 



दरम्यान, गेल्या 18 जून 2022 रोजी हीराबा यांनी त्यांचा 100 वा वाढदिवस साजरा केला. सन 1923 मध्ये जन्मलेल्या हीराबा यांनी नुकतेच शताब्दी वर्षात पदार्पण केलं आहे.