नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी Google CEO सुंदर पिचाई Sundar Pichai यांच्याशी चर्चा केली. पंतप्रधान मोदींनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. पंतप्रधान मोदी यांच्याशी बातचीत दरम्यान सुंदर पिचाई यांनी भारतात डिजिटल अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी 10 बिलियन अमेरिकी डॉलर म्हणजेच जवळपास 75000 कोटी रुपयांच्या गुंतवणूकची घोषणा केली आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधानांनी ट्विट करत सांगितलं की, आज सकाळी सुंदर पिचाई यांच्याशी संवाद साधला. आमच्यात अनेक विषयांवर चर्चा झाली. विशेषत: भारतीय शेतकरी, युवा आणि उद्योजक यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी तंत्रज्ञानाची शक्ती वापरण्याच्या संदर्भात चर्चा झाली. 



आम्ही कोरोना काळात उदयास आलेल्या नवीन कार्यसंस्कृतीबद्दलही चर्चा केली. खेळांसारख्या क्षेत्रात या साथीच्या आजारामुळे उद्भवणाऱ्या आव्हानांविषयीही, डेटा सुरक्षा आणि साइबर सुरक्षेच्या महत्त्वाबाबतही चर्चा झाली असल्याचं, मोदींनी ट्विटद्वारे सांगितलं.