मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत. तौक्ते चक्रीवादळ (Cyclone Tauktae) मुळे झालेल्या नुकसानीबाबत ते पाहणी करणार आहेत. पंतप्रधान मोदी यांचा हा हवाई दौरा असणार आहे. ज्यामध्ये ते गुजरात आणि दीवचा आढावा घेणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीएम मोदी उद्या सकाळी साडे नऊ वाजता दिल्लीहून रवाना होणार आहेत. भावनगर येथे पोहोचल्यानंतर ते ऊना, दीव, जाफराबाद आणि महुवाचा हवाई दौरा करतील. पंतप्रधान मोदी अहमदाबाद येथे आढावा बैठक घेणार आहेत.


तौक्ते चक्रीवादळामुऴे महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये मोठं नुकसान झालं. अनेक ठिकाणी झाडे आणि विजेचे खांब पडले आहेत. घराचं नुकसान झालं आहे. फळबागा उद्धवस्त झालं आहे. 185 किलोमीटरच्या वेगाने गुजरात किनाऱ्यावर वारे वाहत होते.


तौक्ते चक्रीवादळामुळे 13 लोकांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी जवळपास 40 हजार झाडे आणि 16,500 हून अधिक घराचं नुकसान झाल्याची माहिती दिली आहे. 


केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासोबत फोनवर चर्चा केली.