कोची : कोची मेट्रो रेल्वे स्थानकाचं उद्घाटन करण्यासाठी केरळला गेलेल्या पंतप्रधान मोदींच्या जीवाला दहशतवाद्यांपासून धोका होता असा खुलासा पोलीस महासंचालक टी पी सेनकुमार यांनी केला आहे. शनिवारी कडक सुरक्षा व्यवस्थेत पंतप्रधान मोदी कोचीला आले होते. कोची मेट्रो स्टेशनच्या उद्घाटनासाठी राजपाल पी. सदाशिवम, केंद्रीय मंत्री एम वैंकय्या नायडू आणि मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी मेट्रोतून प्रवास ही केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेनकुमार यांनी म्हटलं की, "पंतप्रधान मोदींच्या त्या दौऱ्यावर दहशवतादी हल्ल्याची शक्यता होती. याबाबत अधिक माहिती नाही देऊ शकत.'


पोलीस महासंचालकांनी केला पोलीस कारवाईचा बचाव


केरळचे पोलीस महासंचालकांनी सांगितलं की, केरळ उच्च न्यायालया जवळ प्रदर्शन करणाऱ्यांवर केलेल्या पोलीस कारवाईचं त्यांनी समर्थन केलं. मोदींचा ताफा जेथून जाणार होता त्या ठिकाणी आंदोलन सुरु असल्याने ही कारवाई केली. आंदोलकांनी कोणतीही पूर्वसूचना न देता आंदोलन केल्याने ही कारवाई करण्यात आली.