नवी दिल्ली : Coronavirus अर्थात कोरोना विषाणूने सध्याच्या घडीला संपूर्ण जगभरात एक दहशतच पसरवली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये हा विषाणू असा काही फोफावला, की पाहता पाहता तो भारतातही पसरला. मुख्य म्हणजे कोरोना व्हायरसने भारतात शिरकाव केल्यानंतर परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर जाण्यासाठी देशातील प्रत्येक राज्य आणि केंद्र सरकारने काही कठोर पावलं उचलली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची हात दिली. कोरोना विषाणूची लागण होण्याची साखळी तोडण्यासाठीचे हे काही प्रतिबंधात्मक उपाय. पंतप्रधानांनी दिलेली ही हाक अनेकांनी गांभीर्यान घेतली. पण, काहीजण याला अपवादही ठरले. 


परिस्थितीविषयी अद्यापही गांभीर्याने विचार न करणाऱ्या या मंडळींसाठी आता खुद्द पंतप्रधानांनी लहानग्यांचा खेळ सर्वांसमक्ष आणला आहे. भल्याभल्यांनाही ज्या गोष्टी समजून घेण्यात काहीसा वेळ लागला, तिथेच काही चिमुरड्यांनी मात्र त्यांच्या खेळातून कोरोना व्हायरस म्हणजे नेमकं काय, तो कसा पसरतो आणि त्याची लागण होण्याची साखळी नेमकी कशी तोडायची हे अगदी प्रभावीपणे दाखवलं आहे. 



सोशल  मीडियावरील हाच व्हिडिओ पंतप्रधानांनी शेअर करत, 'बच्चों ने खेल-खेल में जो बता दिया, उसमें कोरोना महामारी से बचने की एक बड़ी सीख है' असं कॅप्शन लिहिलं. त्यांनी शेअर केलेला हा अतिशय सुरेख आणि प्रत्ययकारी व्हिडिओ प्रचंड गाजला. मुळात गाजण्यापेक्षा या व्हिडिओतून अत्यंत महत्त्वाचा असा संदेश साऱ्या देशापर्यंत आणि साऱ्या जगापर्यंत पोहोचला.