नवी दिल्ली : येणाऱ्या काही वर्षांत देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रिलीयन डॉलर पर्यंत नेण्याचे लक्ष्य असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्प सादर करताना सांगितले. या पार्श्वभूमीवर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही विधान केले आहे. 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनण्यास 55-60 वर्षे गेली. आम्ही 5 वर्षात इतकी जोडल्याचे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पुन्हा देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर ते पहिल्यांदाच आपले संसदीय क्षेत्र  वाराणसीत पोहोचले. यावेळी ते बोलत होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय वायुसेनेच्या विमानाने ते लाल बहादुर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर सकाळी 10.30 वाजता पोहोचले. यावेळी विमानतळावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, भाजपा कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा, भाजपा प्रदेश अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री महेंद्रनाथ पांडे यांच्यासहित भाजपाचे नेते उपस्थित होते. 



स्वागत समारंभ कार्यक्रमानंतर बाबतपूर विमानतळावर पंतप्रधानांनी लाल बहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेचे अनावरण केले. लाल बहादुर शास्त्री यांचे पुत्र अनिल शास्त्री आणि भाजपा नेता सुनील शास्त्री यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले. पंतप्रधान मोदींनी टीएफसी म्हणजेच दीन दयाल हस्तकला संकुलास भेट दिली. तिथे त्यांनी भाजपा सदस्यता अभियानाची सुरुवात केली.