Assembly Elections Results 2023 : मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानच्या निकालांनंतर पंतप्रधान मोदींचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. जिथे संसदेत मोदींनी म्हटलेलं.. एक अकेला सब पर भारी. मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान.. तीनही राज्यात भाजपनं दणदणीत कामगिरी केलीय, विशेष म्हणजे या तीनही राज्यांच्या निवडणुका पंतप्रधान मोदींच्या नावावर लढल्या गेल्या. त्यामुळेच ब्रँड मोदी मजबूत झाल्याची चर्चा आहे. ब्रँड मोदी मजबूत का झालाय जाणून घेवूया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोणत्याही राज्यात मुख्यमंत्रीपदासाठी भाजपनं चेहरा दिलेला नव्हता, केवळ आणि केवळ मोदींचा चेहरा पुढे करत भाजप लढली.  मध्य प्रदेशामध्ये 'एमपी के मन में मोदी है' तर राजस्थानमध्येदेखील 'मोदी साथे अपनो राजस्थान' ही घोषणा लोकप्रिय झाली


काँग्रेसनं मांडलेल्या जातीय जनगणनेच्या मुद्द्याला मोदींनी आपल्या खास शैलीत छेद दिला. त्याऐवजी गरीब-युवक-शेतकरी-आदिवासी कल्याण योजना मोदींनी मांडल्या. साईलेंट व्होटर असणा-या महिलांना मोदींनी घातलेली साद महत्त्वपूर्ण ठरली. 2-27 नोव्हेंबरदरम्यान मोदींनी या तीन राज्यात मिळून 42 रॅली आणि 4 मेगा रोड शो केले होते, या रोड शोना भरभरुन प्रतिसाद मिळाला. हिंदी भाषिक पट्ट्यातील मोदींनी भाषणातून घातलेली साद, त्याला लोकांनी दिलेला प्रतिसाद त्यांची लोकप्रियता कायम असल्याचं दाखवते.


मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थानमध्ये काँग्रेस मुख्यमंत्रीपदाचा संभाव्य चेहरा पुढे करत लढली तर भाजप केवळ आणि केवळ पंतप्रधान मोदींच्या चेह-यावर लढली. तीनही राज्यात भाजपनं दणदणीत कामगिरी केली. त्यामुळे ब्रँड मोदी आणखी मजबूत झालाय असं निश्चितपणे म्हणता येईल.


मोदींच्या करिष्म्य़ाचं यश - एकनाथ शिंदे


4 पैकी 3 राज्यांचा निकाल हे मोदींच्या करिष्म्य़ाचं यश असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. त्याचबरोबर मोदींवर टीका करणा-यांना जनतेनं धडा शिकवल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदेंनी दिली.


देशाचा मूड भाजपसोबत - नितीन गडकरी 


देशाचा मूड भाजपसोबत असल्याची प्रतिक्रिया, भाजपच्या विजयानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. हा मोदींच्या धोरणांचा विजय असल्याचं ते म्हणाले. तसंच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय अध्यक्ष J P नड्डांचं अभिनंदन केलं.


3 राज्यातील विजयामुळे मोदींची लोकप्रियता वाढली - छगन भुजबळ


राजस्थान, मध्य प्रदेश आणि छतीसगडमधील विजयाचं श्रेय मंत्री छगन भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलंय. पंतप्रधानांचा करिष्मा कमी झालेला नाही. 3 राज्यातील विजयामुळे मोदींची लोकप्रियता वाढलीय...हा विजय भाजप आणि पंतप्रधान मोदींचा असल्याची प्रतिक्रिया भुजबळांनी दिलीय.