नवी दिल्ली : PM Narendra Modi to chair Covid review meet : देशात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मुंबईसह दिल्ली आणि उत्तर प्रदेशात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. कोविड रुग्णवाढीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. यावेळी मोदी घोषणा करण्याची शक्यता आहे. मास्क सक्ती आणि बूस्टर डोसबाबत महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये एकमेकांसमोर असणार आहेत. देशातील कोरोनाच्या स्थितीबाबत पंतप्रधान आज दुपारी 12 वाजता सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत.  सध्या भाजप आणि शिवसेनेमध्ये वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आजच्या व्हीसीमध्ये दोघांमध्ये काय चर्चा होते, याची उत्सुकता आहे. 


देशभरात पुन्हा कोरोना वाढत असल्याने राज्यात मास्क सक्ती होण्याची शक्यता आहे. राज्यात पुन्हा बंदिस्त ठिकाणी मास्क सक्ती करा अशी शिफारस टास्क फोर्सने मुख्यमंत्र्यांकडे केलीय...कोरोना वाढत असल्याने मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्स सोबत बैठक घेतली. यावेळी टास्क फोर्सने सूचना दिल्यायत...काही रुग्ण रॅपिड टेस्ट करून घरीच उपचार घेत असून, त्यांना विलगीकरणातील आवश्यक उपचार घेणं गरजेचं आहे. मात्र, तसं होताना दिसून येत नसल्याचं निरीक्षणही टास्क फोर्सच्या सदस्यांनी नोंदवले आहे.


तसेच आज दुपारी पंतप्रधानांसोबत सर्व मुख्यमंत्र्यांची व्हीसी होणार आहे. त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता मुख्यमंत्री सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री मास्कबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. 


 टास्क फोर्सच्या या सूचना  


- बंदिस्त ठिकाणी मास्क लावणे बंधनकारक करावे
- चित्रपटगृह, नाट्यगृह, मॉल्स अशा ठिकाणी मास्क बंधनकारक करावे
- विमान कंपन्या प्रवाशांना मास्क वापराविषयी वारंवार सूचना देतात
- रुग्णालयांमध्येही मास्कचा वापर प्राधान्याने करावा
- राज्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढवणे
- दुसऱ्या डोसनंतर बूस्टर डोसचं अंतर कमी करुन 180 दिवसांवर आणावे