मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लंडनच्या सेंट्रल हॉल वेस्टमिंस्टरमध्ये 'मन की बात, सबके साथ' या कार्यक्रमातून अनेक मुद्यांवर आपली रोख मत मांडली. या कार्यक्रमात त्यांनी एका बाजूला देशाच्या वाढत्या ताकदबद्दल सांगितलं तर नाव न घेता पाकिस्तानवर देखील आपला निशाणा साधला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कठुआ आणि उन्नाव बलात्कार प्रकरणावर देशभरातून आक्रोश पाहायला मिळत आहे. या मुद्यावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलले की, बलात्कार, बलात्कार असतो. आणि त्याचं राजकारण केलं जाऊ शकत नाही. कोणत्याही मुलीवर झालेला बलात्कार हा देशासाठी शर्मेची बाब आहे. 



काय म्हणाले पंतप्रधान मोदी? 


तसेच ते म्हणाले की, आपण कायम आपल्या मुलींना विचारतो तुम्ही काय करता? कुठे जाता? मात्र आता आपण आपल्या मुलांना देखील विचारलं पाहिजे. जी व्यक्ती हा अपराध करत असेल तो देखील कुणाचा तरी मुलगा आहे. मी या सरकारच्या आणि त्या सरकारच्या काळात झालेल्या बलात्कारांच्या घटनांच्या मोजणीत कधीच गेलो नाही. बलात्कार हा बलात्कार आहे. मग तो आता झाला काय ? आणि या अगोदर झाला काय? ही खूप दुर्दैवी बाब आबे. बलात्कारांच्या घटनांच राजकारण केलं जाऊ शकत नाही. 


संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या कठुआ आणि उन्नाव बलात्कार प्रकरणावर मौन बाळगल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींना काँग्रेसने कोंडीत पकडले होते. मोदींवर अत्यंत बोचऱ्या शब्दात टीका केली होती. पण मोदींनी आता जागतिक मंचावरुन काँग्रेससह विरोधकांनी केलेल्या आरोपांना उत्तर दिले आहे. महिलांविरोधातील वाढती गुन्हेगारी चिंताजनक बाब असल्याचे मोदींनी मान्य केले पण त्याचवेळी कोणी या घटनांचे राजकारण करु नये असे त्यांनी म्हटले आहे.