नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी कायमच देशवासियांशी संवाद साधत काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करतात. देशाला सजग करतात, किंवा नव्या योजनांबाबतही माहिती देतात. यावेळीसुद्धा पंतप्रपधान आज म्हणजेच रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास संवाद साधणार आहेत. 'मन की बात' या उपक्रमाअंतर्गत ते देशाशी संवाद साधतील. या कार्यक्रमाचं हे ६८ वं सत्र असणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या माध्यमातून पंतप्रधान देशातील नागरिकांच्या भेटीला येतील. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास या कार्यक्रमाचं पुनर्प्रसारण करण्यात येणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच पंतप्रधानांनी देशातील नागरिकांकडून काही सल्ले मागवले होते, त्याच आधारावर आजचा 'मन की बात' हा कार्यक्रम असेल. यावेळी मोदी नेमकी कोणती घोषणा करतात, याकडेच साऱ्या देशाचं लक्ष असणार आहे. 


मोबाईलच्या माध्यमातून मोदींचा हा कार्यक्रम ऐकण्यासाठी तुम्हाला १९२२ हा क्रमांक डायल करावा लागणार आहे. ज्यानंतर तुम्हाला एक फोन येईल. पुढं तुम्ही प्राधान्यानुसार भाषा किंवा प्रादेशिक भाषा निवडू शकता. परिणामी तुम्हाला हव्या त्या भाषेत 'मन की बात' तुम्ही ऐकू शकता. 


 


पंतप्रधानांनी देशाशी संवाद साधताना अनेकदा त्यांच्या भूमिका स्पष्ट केल्या आहेत. त्यातच त्यांनी शेजारी राष्ट्र पाकिस्तानवर निशाणाही साधला होता. पाकिस्तानकडून भारतीय भूमीवर ताबा मिळवण्याची योजना करण्यात आल्याचं मोदी म्हणाले होते. शिवाय त्यांनी देशातील तरुणाईला कारगिल युद्धादरम्यानच्या काही शौर्यगाथा समोर आणण्याचं आवाहनही केलं होतं.