नवी दिल्ली : ब्रिटनचे राजकुमार प्रिन्स चार्ल्स आणि त्यांची पत्नी राजकुमारी कॅमिला पार्कर दोन दिवसांच्या भारत दौ-यावर आलेत. .


प्रिन्स चार्ल्स आणि कॅमिला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. याशिवाय त्यांनी दिल्लीत भारत-ब्रिटनच्या संस्कृतीवर आधारित ब्रिटीश काऊंसिलच्या कार्यक्रमाला हजेरीही लावली. हे दाम्पत्य चार आशियाई देशांच्या दौ-यावर आहेत. यांत भारत, सिंगापूर, मलेशिया आणि ब्रुनई या देशांचा समावेश आहे.