नवी दिल्ली : भारतीय रेल्वे लवकरच भाडे तत्वाची अंमलबजावणी करणार आहे. भारतीय रेल्वे द्वारे चालवण्यात येणाऱ्या सांस्कृतिक, धार्मिक आणि अन्य पर्यटक सर्किट ट्रेन्स आता खासगी कंपन्यांचा भाग होतील. खासगी कंपन्या आता रेल्वे कोच भाड्याने घेणे किंवा खरेदी करू शकतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेल्वेने शनिवारी एक प्रकाशन जारी केले आहे. त्यामध्ये भाडे तत्वाबाबत योजनेचे धोरण, नियम आणि अटी तयार करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने कार्यकारी निर्देशक स्तरावरील समितीचे गठन केले आहे. खासगी कंपन्यांना ट्रेन भाड्याने मिळणार आहे.यासाठी नियमावली तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहे. भाड्याने ट्रेन मिळाल्यानंतर कंपनी सांस्कृतिक, धार्मिक आणि अन्य थीमवर रेल्वे प्रवास तयार करू शकतील.


कमीत कमी 16 कोच असणारी ट्रेन 
भारतीय रेल्वेच्यावतीने सांगण्यात आले आहे की, इच्छुक कंपनीने थीमवर आधारित सांस्कृतिक, धार्मिक आणि अन्य पर्यटक सर्किट ट्रेन चालवण्यासाठी कोचिंग स्टॉकला भाड्याने देऊन रेल्वे पर्यंटन वाढवण्याचे ध्येय आहे. सूत्रांच्या मते कंपनीला 16 कोट असलेली ट्रेन खरेदी किंवा भाड्याने घेणे गरजेचे असणार आहे.त्यानंतर ते कोचला रेल्वे गाइडलाईन्सच्या अधिन राहून आपल्या परीने प्रवाशांसाठी तयार करतील.



कोचमध्ये मोठे बदल करण्याची परवानगी रेल्वेकडून दिली जाणार नाही. कंपन्या कोचच्या लुकमध्ये थोडाफार बदल करू शकतील. कोचला आकर्षक बनवण्यासाठी योग्य ते प्रयत्न करू शकतील. ट्रेन किमान 5 वर्षांसाठी कंपनीला सोपवण्यात येईल. 


कंपनीने सर्वात आधी आपले बिझनेस मॉडेल सादर करणे गरजेचे असेल. त्यानंतर रेल्वे निर्णय घेईल की, कंपनीला कोच भाडे तत्वावर द्यायचे की नाही.