खासगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी; पगारावर होणार मोठा परिणाम
आताच वाचा ही बातमी
New Wage Code: येत्या महिन्याच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच 1 जुलैपासून केंद्र सरकारकडून एक मोठा बदल सर्वांच्याच जीवनावर परिणाम करणार आहे. खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी ही मोठी बातमी आहे, कार नवी वेतन प्रणाली सरकारकडून लागू करण्यात येणार आहे.
नव्या वेज कोडला लागू करण्यात येणार असल्यामुळे याचे थेट परिणाम तुमच्या हातात येणाऱ्या पगारावर अर्थात इन हँड सॅलरीवर होणार आहेत. New Wage Code 2019 जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून लागू करण्यात येणार आहे.
उदाहरणार्थ कोणत्याही कर्मचाऱ्याच्या सीटीसीमध्ये मूळ वेतन, एचआरए, निवृत्तीनंतर मिळणारे फायदे (पीएफ, ग्रॅच्युटी आणि इतर) यांची ाकडेवारी बदलणार आहे.
सीटीसीच्या 50 टक्के मूळ वेतनाचा आकडा
सद्यस्थितीला कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये मूळ वेतन (Basic Salary) 30 ते 40 टक्के इतकं असतं. याशिवाय स्पेशन अलाउंस, एचआरए, पीएफ हे भाग असतात. याच धर्तीवर तुमच्या पगारातून पीएफची रक्कम कापली जाते.
नव्या आखणीनुसार मात्र आता मूळ वेतन हे सीटीसीच्या 50 टक्के इतकं असणार आहे. याचा थेट परिणाम पीएफ आणि ग्रॅच्युटीवर होणार आहे.
सोप्या भाषेत समजून घ्या गणित
उदाहरण म्हणून समजा तुमचा सीटीसी 50 हजार रुपये इतका आहे, तर सध्या तुमचं मूळ वेतन 15 हजार रुपये इतकं असेल. यानुसार दरमहा तुमचं पीएफ योगदान 1800 रुपये इतकं असेल (मूळ वेतनाच्या 12 टक्के).
नव्या नियमानुसार 50 हजार रुपयांच्या सीटीसीवर तुमचं मूळ वेतन 15 हजारांवरून आता 50 टक्क्यांच्या नियमाप्रमाणं 25 हजार रुपये इतकं होणार आहे. यावर 12 टक्क्यांच्या प्रमाणानं पीएफ योगदान 3000 रुपये प्रतीमहा होणार आहे. म्हणजेच आता तुम्हाला पगारात 1200 रुपये कमी येणार.
निवृत्तीनंतर मिळणार जास्त वेतन
मूळ वेतन वाढण्याचे थेट परिणाम तुमच्या निवृत्तीवेतनावर अर्थात पीएफ आणि ग्रॅच्युटीवर होणार आहेत. हातात येणारा पगार कमी होणार असला तरीही निवृत्तीनंतर मात्र हातात मिळणारी रक्कम ही जास्त असणार आहे.